संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- संपूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळा शिव राज्य प्रतिष्ठान, लायंस क्लब कामठी सेंट्रल, श्री गणपतराव वस्ताद का अखाड़ा कामठी व लायंस फ़िजिकल अकैडमी यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमात महाराजांची आरती, चित्रकला स्पर्धा, पारंपारिक अखाड़ा आणि विदर्भ स्तरीय भव्य रक्तसमर्पण रक्तदान शिबीर घेन्यात आले आणि या रक्तसमर्पण मध्ये ४४० शिवमावळयाँनी रक्तदान केले . या शिबीर मध्ये AIIMS (एम्स) हॉस्पिटल रक्तपेढी, सुपर मेडिकल रक्तपेढी व लाइफलाइन रक्तपेढी यांचा समावेश होता.
शिवजन्मोत्सव सोहळयात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन श्रीमंत डॉ. राजे मुधोजीं भोंसले महाराज व युवराज जयसिंह राजे भोंसले, प्रमुख अतिथि रामटेक लोकसभेचे खासदार कृपाल तुमाने, कामठी मौदा विधानसभेचे आमदार टेकचंद सावरकर , माज़ी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे, माज़ी जि. प. अध्यक्ष सुरेश भोयर, लायंस डिस्ट्रिक्ट गवर्नर श्रवण कुमार, उदयसिंहजी उर्फ़ गज्जूभैया यादव, अनिल निधान, अजय अग्रवाल, अजय कदम, मुख्याधिकारी न. प. कामठी संदीप बोरकर, पोलिस निरीक्षक जूनी कामठी दीपक भिताड़े, रनाळा सरपंच पंकज साबळे, गादा सरपंच सचिन डांगे, राधेश्याम हटवार, काशीनाथ प्रधान, जयराज नायडू, संजय कनोजिया उपस्थित होते.
या कार्यक्रमात शिव राज्य प्रतिष्ठान चे व लायंस क्लब चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते
शिव राज्य प्रतिष्ठान ने गरजूंना निःशुल्क रक्त देन्याची ज़बाबदारी घेतली आहें.