पीएम स्वनिधी योजना अंतर्गत ४००८ पथविक्रेत्यांना मिळाला लाभ

– ८०२ लाभार्थ्यांनी घेतला रुपये २० हजार कर्जाचा लाभ,

– ६० लाभार्थ्यांनी घेतला ५०,०००/- हजार कर्जाचा लाभ

– पथविक्रेत्यांसाठी केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा

चंद्रपूर :- प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना ( पीएम स्वनिधी योजना) अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या १० हजार रुपये कर्जाचा लाभ आतापर्यंत ४००८ लाभार्थ्यांनी घेतला आहे. यातील ८०२ लाभार्थ्यांनी कर्ज परत करून रुपये २० हजार रुपये कर्जाचा लाभ घेतला असुन ६० लाभार्थ्यांना ५०,००० रुपयांचे कर्ज प्राप्त झाले आहे.

चंद्रपूर महानगरपालिका येथे यासंदर्भात आढावा बैठक अति. आयुक्त चंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खाली ८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेली होती. मनपाच्या वतीने स्वनिधी से समृद्धी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करीता राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान संदर्भात बैठक घेऊन पथविक्रेत्यांसाठी केंद्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

स्वनिधी से समृद्धी योजने अंतर्गत कर्ज घेतलेल्या पथविक्रेत्यांना शासनाच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना,प्रधानमंत्री जन धन योजना, इमारत व इतर बांधकाम नोंदणीकरण,प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना,एक राष्ट्र एक राशन कार्ड,जननी सुरक्षा योजना,प्रधानमंत्री मातृवंदन योजना या सर्व योजनांचा लाभ मोबाईल ॲपद्वारे सर्वेक्षण झालेल्या व्यक्तींना घेता येणार आहे.

पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय सुरु करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना व्यवसायाकरीता एका वर्षासाठी विनातारण कर्ज रु.१०,०००/- राष्ट्रीयकृत बँक मार्फत देण्यात येते. जे पथविक्रेते नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना बँकेकडून २० हजारांचे अतिरीक्त कर्ज उपलब्ध केले जाते.चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत ही योजना कार्यान्वित असून या योजनेच्या लाभाकरीता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु असुन सर्व पथविक्रेत्यांनी १० हजार रुपये कर्जासाठी अर्ज करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

या प्रसंगी अतिरीक्त आयुक्त चंदन पाटील, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक प्रशांत धोंगळे,इतर बँकेचे प्रबंधक,शहर अभियान व्यवस्थापक रफीक शेख,रोशनी तपासे,चिंतेश्वर मेश्राम, खडसे, लोणारे,मुन,करमरकर उपस्थीत होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नांदेड शहरात बागडेंचा जंगी सत्कार आणि पदग्रहण सोहळा 

Wed Aug 9 , 2023
नागपूर :- नांदेड येथील पोचिराम कांबळे, गौतम वाघमारे , जनार्दन मोवाडे यांच्या शहादत ने पावनखिंड झालेल्या नांदेड नगरीत आंबेडकरी विचार मोर्चा आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांचे आगमन झाले. याप्रसंगी हुजूर साहेब रेल्वे स्टेशन नांदेड समोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बागडे यांचे भव्य स्वागत करण्यात आले. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com