संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वारीसपुरा येथिल ऑईस फेक्ट्री जवळील एका घरातून अज्ञात चोरट्याने अवैधरित्या घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटातून नगदी दीड लक्ष रुपये व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 4 लक्ष 82 हजार रुपयांची घरफोडी केल्याची घटना घडली असून यासंदर्भात फिर्यादी रेहान अहमद वय 19 वर्षे रा वारीसपुरा कामठी ने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी ने आपल्या घराचा गेट न लावता बेडरूम मध्ये गाढ झोपी गेले असता अज्ञात चोरट्याने ही संधी साधून घरात अवैधरित्या प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी कपाटातील नगदी दीड लक्ष रुपये व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण चार लक्ष 82 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना गतरात्री घडली.यासंदर्भात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे