वारीसपुऱ्यात 4 लक्ष 82 हजार रुपयांची घरफोडी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वारीसपुरा येथिल ऑईस फेक्ट्री जवळील एका घरातून अज्ञात चोरट्याने अवैधरित्या घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटातून नगदी दीड लक्ष रुपये व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 4 लक्ष 82 हजार रुपयांची घरफोडी केल्याची घटना घडली असून यासंदर्भात फिर्यादी रेहान अहमद वय 19 वर्षे रा वारीसपुरा कामठी ने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी ने आपल्या घराचा गेट न लावता बेडरूम मध्ये गाढ झोपी गेले असता अज्ञात चोरट्याने ही संधी साधून घरात अवैधरित्या प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी कपाटातील नगदी दीड लक्ष रुपये व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण चार लक्ष 82 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना गतरात्री घडली.यासंदर्भात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला विकास कामांचा आढावा

Sat Jul 8 , 2023
नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. मंत्री महोदयांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला आमदार मोहन मते, महा मेट्रोचे एमडी नितीन करीर, जिल्हाधिकारी विपिन इटनकर, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये विशेषत्वाने मेट्रो स्थानकांवरील सोयीसुविधा, फिडर बसेस, पावसामुळे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com