संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 25:- राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी)मोर्चाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष विकास पटेल चौधरी यांच्या नेतृत्वात विविध सामाजिक मुद्द्यावर आधारित चरणबद्ध आंदोलन केले असून यापूर्वी धरणे आंदोलन आणि रॅली प्रदर्शनसुदधा करण्यात आले आहेत त्याआधारेच आज 25 मे 2022 रोजी भारत बंद चे आयोजन करण्यात आले होते.या आंदोलनासाठी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील विविध संघटनांनी भारत बंद ला पाठींबा व सक्रिय सहभाग दर्शविला असून कामठी शहरातही या भारत बंद ला संमिश्र प्रतिसाद प्राप्त झाला. या भारत बंद आंदोलनातील मुद्दे हे येथील जनसामान्य ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याक यांच्या सामाजिक हिताचे असल्याने येथील बहुजन क्रांती मोर्चा,राष्ट्रीय पिछडा वर्ग(ओबीसी मोर्चा),भारत मुक्ती मोर्चा चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.
हे भारत बंद आंदोलन 10 सामाजिक मुद्द्यावर करण्यात आले. ज्यामध्ये केंद्र सरकार द्वारा इतर मागासवर्ग (ओबीसी)ची जातींनीहाय जनगणना करणे, ईव्हीएम घोटाळ्याच्या विरोधात व ईव्हीएम बंद करून बँलेट पेपरवर निवडणुका घेणे,खाजगी क्षेत्रामध्ये एससी, एसटी , ओबीसीना आरक्षण लागू करणे, एमएसपी गॅरंटी कायदा बनवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे, , एन आर सी/, सी ए ए,/एन पी आर चा विरोध , जुनी पेन्शन योजना लागू करणे, मध्यप्रदेश ,ओडीसा आणि झारखंड मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र मतदार संघ लागू करणे, पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली आदिवासींना जल, जंगल व जमिन यापासून विस्थापित करण्याचा विरोध करणे, जबरदस्ती दबाव आणून करण्यात येत असणाऱ्या कोरोना लसीकरण चा विरोध करणे, लॉकडांऊन काळात कामगारांच्या विरोधात बनविलेल्या श्रमिक कायद्याचा विरोध करणे चा समावेश आहे.
हे भारत बंद आंदोलनाला कामठी तुन सहंभाग प्राप्त झाला असून हेमलताताई पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाची सुरुवात जयस्तंभ चौक स्थित परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला उपस्थित पदाधिकारी च्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन वाहण्यात आले.जयस्तंभ चौकात आंदोलनातील 10 मुद्द्यावर भाषणात्मक मार्गदर्शन करून नागरिकांना जागृत करण्यात आले .याप्रसंगी रस्त्यावरील नागरिकांना आंदोलनाचे माहितीपत्रक वितरण करून आंदोलनाची सांगता करण्यात आली.
25 मे च्या भारत बंद आंदोलनाला कामठीत संमिश्र प्रतिसाद
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com