मोतीराम रहाटे, प्रतिनिधी
कन्हान (नागपुर) : – शितल लेडीज कलेक्शन आणि दिंगाबर फॅशन कांद्री या दोन दुकानातुन एक अनोळखी पुरुष आणि महिलेने कपडयाची खरेदी करुन बनावटी स्कॅन ने पेमेंट केल्याबाबतचा खोटे मॅसेज दाखवुन दुकान दाराची फसवणुक केल्याने कन्हान पोलीसांनी दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आहे.
प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.२१) फेब्रुवारी ला शितल ब्रिजेश भदोरीया वय ४४ वर्ष रा. फुटाना ओली शिव मंदीर जवळ कामठी यांनी आपले दुकान नेहमी प्रमाणे सकाळी १०.३० वाजता दरम्यान सुरू केले असता ११.४५ वाजता एक अनोळखी महिला चेहऱ्याला दुपट्टा बांधुन व एक पुरुष डोक्यात हेल्मेट व तोंडाला मास लावुन दुकानात आले व अनोळखी महिलेनी शितलला कपडे दाखवा असे म्हटल्या नंतर शितलने त्यांना दुकानातील कपडे दाखविले असता त्यांनी १०५० रु प्रमाणे ६ लेडीस कुर्ती व १२५० रु.प्रमाणे २ कुर्ती असे एकुण ८,८०० रुपयाचे कपडे पसंद करुन विकत घेतले. त्याचे पैसे दोन अनोळखी इसमांनी ऑनलाईन भारत अँप नी ट्रान्सफर करून देतो असे म्हणुन मोबाइल वरून पेमेंन्ट सक्सेस झाले म्हणुन दाखवुन दुकानातील विकत घेतलेले कपडे घेवुन निघुन गेले. शितल ने मोबाईलचे अँप वर पैसे जमा झाले की नाही बाबत चेक केले असता शितलच्या मोबाईल अँप वर खात्यात पैसे जमा झाले नाही. या वरून शितला वाटले की, त्या दोन इसमांनी फसवणुक करून पळुन गेले. त्यानंतर शितल ने दुकानात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता त्यात दोन्ही इसमांचे फोटो कॅमेऱ्यात दाखवत असुन त्यांनी एका पांडऱ्या रंगाची बिना नंबर ची मोपेड गाडी घेवुन कपडयाच्या दुकानाच्या समोरुन घाई घाईत पळुन गेले. शितल ने आजु बाजुला विचारपुस करुन चर्चा केली. असता गुरुवार (दि.२३ ) फेब्रुवारी ला दुपारी ३.३० वाजता माहिती मिळाली कि अश्या प्रकारचे दोन इसम दिगांबर फैशन येथे (दि.२३) फेब्रुवारी ला सकाळी ११.४५ वाजता दरम्यान एक महिला व एक पुरुष सारखेच चेहऱ्यावर कपड़ा व डोक्यात हेलमेट घालुन बिना नंबरची मोपेड गाडीने येवुन तेथील दिगांबर फैशन कापडा च्या दुकानात हजर असलेली महिला ग.भा विद्या वसंता लंडगे वय ३९ वर्ष रा. वार्ड क्र ३ टेकाडी या महिले कडुन दोन साडया ३००० रु प्रमाणे, ४ कुर्ती ८६० रु प्रमाणे, ३ कुर्ती ११०० रु प्रमाणे असा एकुन १२७४० रुपया चा माल विकत घेतला व तेथे फोन पे नी पेमेंन्ट केलेला आहे. पेमेंन्ट सक्सेस झाला म्हणुन मोबाईल वरुन सक्सेस झाल्या बाबत खोटे मैसेज दाखवुन पळुन गेले. सदर दोन अनोळखी इसमांनी शितल लेडीज कलेक्शन व दिंगा बर फॅशन कांद्री या दोन्ही दुकानातुन एकुण २१,५४० रुपयांचा कपडयाची खरेदी करुन ऑनलाईन पेमेंट केल्या बाबतचा खोटे मॅसेज दाखवुन फसवणु क करुन पळुन गेल्याने कन्हान पोलीसांनी शितल भदोरिया यांच्या तक्रारीने पोस्टे ला दोन अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४२०,३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात कन्हान पोलीस सीसीटीवी फुटेज च्या आधारे तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.