पारशिवनी:- नगर पंचायत पारशिवनीच्या वतीने मुख्याधिकारी अर्चना वंजारी ,नगराध्यक्ष प्रतिभा कुंभलकर व उपाध्यक्ष माधुरी भिमटे, सभापती बाधकाम विभाग सभापती आशा वैद्य, सभापती पाणी पुरवठा विभाग सभापती अनिता भड, नगरसेवक सत्ता पक्ष गट नेता दीपक शिवरकर तसेच सर्व नगरसेवक त्याचप्रमाणे प्रशासकीय अधीकारी दत्ता किलबिले, मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांच्या उपस्थितीत नगर पंचायतचा सामान्य निधीतुन १०९ दिव्यांगन लाभार्थी यांना ५ टक्के निधी वितरित करण्याकरिता स्वच्छ भारत अभियानांतर्गत शून्य कचरा प्रणाली व दिव्यांग दिन ७ डिसेबरला कार्यक्रम आज बुधवार दिनांक ७ डिसेंबर २0२२ ला नगरपंचायत पारशिवनी कार्यालयांचा पटागणात साजरा करण्यात आला.या प्रसगी कार्यक्रमात नगर पंचायत हदीतिल एकुण १०९ दिव्यांग लाभार्थी लोकांना प्रती व्यक्ती २५३२/-रुपयां प्रमाणे एकुण २. लाख ७५. हजार ९८० रुपयाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी येथील नगर पचायत चे कर्मचारी व दिव्यांग लाभार्थी तसेच नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.