सईद नगरात 50 हजार रुपयाची घरफोडी..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 5 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा येथील सईद नगर परिसरातील एका कुलूपबंद घरात घरी कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराचा कुलूप तोडून घरात अवैधरित्या प्रवेश करून घरातील लोखंडी आलमारीतील नगदी 50 हजार रुपये चोरून नेल्याची घटना गतरात्री साडे दहा दरम्यान घडली असून यासंदर्भात फिर्यादी आसिफ मो खुर्शीद वय 38 वर्षे रा सईद नगर कळमना रोड कामठी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध भादवी कलम 457,380 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अशासकीय व स्वयंसेवी संस्थांनी क्षयरुग्णांचे पालकत्व स्वीकारावे - मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांचे आवाहन

Sat Nov 5 , 2022
– क्षयरोगमुक्त भारत अभियानाची बैठक  नागपूर :-  राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत येत्या २०२५ पर्यंत ‘क्षयरोग मुक्त भारत’ करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या अनुषंगाने क्षयरुग्णांना लागणाऱ्या पौष्टिक आहारासाठी अशासकीय आणि स्वयंसेवी संस्थांनी क्षयरोग बाधित रुग्णांचे पालकत्व स्वीकारत क्षयरोग हद्दपार करण्यास मदत करावी असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील सभागृहात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com