CRPF कॅम्प येथील गट केंद्रातील 193 उमेदवारांना वैयक्तिकरित्या नियुक्तीपत्रे रोजगार मेळाव्याचे आयोजन CRPF कॅम्प येथील संपन्न

नागपूर :- मंगळवार 22 नोव्हेंबर रोजी ग्रुप सेंटर, CRPF नागपूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये भारत सरकारच्या CISF, BSF, SSB, आसाम रायफल, NCC रेल्वे, भारतीय खाण ब्युरो, इन्कमटॅक्स, भौगोलिक सर्वेक्षण, एम्स, कॅनरा बँक, युको बँक, बॅक ऑफ बडोदा, ईएसआईसी, पोस्ट मध्ये निवडल्या गेले. यांसारख्या विविध कार्यालयांमध्ये एकूण 193 उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी सर्वचपोस्टने भाग घेतला होता. या कार्यक्रमात भारत सरकारच्या विविध विभागातील नोकरीसाठी ७१ हजारांहून अधिक तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आले. प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या ग्रुप सेंटरमध्ये आदरणीय पंतप्रधान श्री.मा. नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते रिमोटचे बटण दाबून ऑनलाइन पाठवण्यात आली.

त्यानंतर देशात 45 ठिकाणी आयोजित रोजगार मेळाव्यात सहभागी तरुणांना संबोधित करताना त्यांनी “कर्मयोगी प्ररंभ” मॉड्यूल लाँच केले. ज्याद्वारे नवनियुक्त कर्मचाऱ्यांना ऑनलाइन अभिमुखता अभ्यासक्रमाची सुविधा मिळणार आहे. पंतप्रधानांच्या अभिभाषणानंतर कार्यक्रमाचे अतिथी रणदीप दत्ता, पीएमजी, पोलीस महानिरीक्षक, पश्चिम क्षेत्र, सीआरपीएफ, नवी मुंबई यांनी आपल्या उमेदवारांना नियुक्ती पत्रदेऊन सुरुवात केली. त्यानंतर रोजगार मेळाव्यात उपस्थितीत इतर वरिष्ठ अधिकारी पी.आर.जांभोळकर, पोलीस उपमहानिरीक्षक, ग्रुप सेंटर, नागपूर, के.एम.बाली, मुख्यआयुक्त, प्राप्तिकर, शोभा मधले, पोस्ट मास्टर जनरल, ऋचा खरे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे, विशाल साखरे, संचालक, G.S.I. यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. अशाप्रकारे या गट केंद्रातील 193 उमेदवारांना वैयक्तिकरित्या नियुक्तीपत्रे देण्यात आली.

22 ऑक्टोबर 2022 रोजी, धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “मेगा रिक्रूटमेंट ड्राइव्ह” लाँच करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत डिसेंबर 2023 पर्यंत एकूण 10 लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत विभिन्न स्पर्धांचे आयोजन

Thu Nov 24 , 2022
चंद्रपूर :- स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे विभिन्न स्पर्धा आयोजीत करण्यात आलेल्या आहेत. यात जिंगल स्पर्धा, चित्रकला / पोस्टर मेकींग स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा, म्युरल आर्ट स्पर्धा, शॉर्ट मुव्ही स्पर्धा तसेच निबंध स्पर्धेचा समावेश आहे. स्वच्छ अभियान अंतर्गत समाजाच्या विविध वयोगटातील नागरीकांचा स्वच्छता मोहीमेत सहभाग असावा या दृष्टीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील प्रत्येक शाळा, कॉलेज मध्ये या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com