संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मागील तीन दिवसांपासून सायंकाळी सहा दरम्यान कामठी तालुक्यात वादळ वाऱ्यासह झालेल्या गारपीटी पावसामुळे कामठी तालुक्यातील भुगाव, नान्हा,मांगली,शिरपुर, धारगाव,लिहिगाव,आसलवाडा, भामेवाडा,केसोरो, अंबाडी, खापा, झरप,आडका यासारख्या 53 गावात 995 शेतकऱ्यांचे 716 हॅकटर वरील शेत पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कामठी तालुका कृषी कार्यालयाने सादर केला आहे.
त्यामध्ये प्रामुख्याने 483.1 हॅकटर वरील गव्हाचे पीक, 125.4, हॅकटर वरील हरभराचे पीक,101.6 , हॅकटर वरील भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे. तर या अवकाळी पावसाच्या थैमानाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले.शेतकऱ्यांच्या शेत पिकावर नैसर्गिक संकटाची मालिका दरवर्षीच कोसळत असते यामुळे दरवर्षीच शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे नुकसानीला सामोरे जावे लागते.या नुकसांनग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने त्वरित मदतिचा हात देऊन दिलासा द्यावा अशी मागणी कामठी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने माजी जी प सदस्य अनिल निधान यांनी केले आहे.