श्रावणबाळ लाभार्थ्यााचे थकीत ६ महिन्याचे अनुदान त्वरित द्या

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

माजी खासदार व ग्रामौन्नती प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष  प्रकाश जाधव हयानी तहसिलदार मार्फत सरकार ला केली मागणी. 

कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील श्रावणबाळ योजना अंतर्गत पंधराशे लाभार्थ्याना मिळणारे साहयता अनुदान मागील सहा महिन्या पासुन मिळाले नसल्याने दिवाळी सुध्दा अंधारात दिसत असल्याने तालुक्यातील श्रावणबा ळ योजना लाभार्थ्याचे थकीत सहाय्यता अनुदान त्वरित देण्याची मागणी तह सिलदारा मार्फत शासनास शिवसेना माजी खासदार व ग्रामौन्नती प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष प्रकाश भाऊ जाधव हयानी केली आहे.

कुणाचाही आधार नसलेल्या वयोवृध्द नागरिकांना शासना व्दारे श्रावण बाळ योजने अंतर्गत आर्थिक सहाय्यता अनुदान प्रदान करण्यात येते. परंतु एप्रिल २०२२ पासुन चे आतापर्यंत ६ महिन्याचे अनुदान मिळाले नसल्याने ते थकीत आहे. दिवाळी सारख्या सणाला सुध्दा अनुदान प्राप्त न झाल्याने वयोवृध्द नागरिकांनी आपल्या व्यथा शिवसेना माजी खासदार व ग्रामौन्नती प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष प्रकाश भाऊ जाधव हयाना सांगितल्याने शुक्रवार (दि.२१) ऑक्टोंबरला श्रावणबाळ योजना लाभार्थी वयोवृध्दासह पारशिवनी तहसिलदार प्रशांत सांगळे यांचेशी तहसिल कार्यालयात भेटुुन चर्चा करून पारशिवनी तालुक्यातील १५०० श्रावणबाळ योजना लाभार्थ्याचे थकीत ६ महिन्याचे सहाय्यता अनुदान त्वरित देण्याची मागणी तहसिलदारा मार्फत शासनास माजी खासदार व ग्रामौन्नती प्रतिष्ठानचे संस्था पक अध्यक्ष प्रकाश जाधव हयानी केली आहे. याप्रसंगी नायब तहसीलदार  रणजित दुसावार, नायब तहसिलदार  आडे प्रामुख्याने उपस्थित होते. शिष्टमंडळात  मोतीराम रहाटे, प्रविण गोडे, सचिन साळवी, कमलजी पालीवाल, प्रदीप वानखेडे, कैलास खंडार, रविंद्र चौधरी, विशाल सहारे, वयोवृध्द लाभार्थी शामराव सरोदे, हरीचंद हारगुळे, मनोहर दमाये, शोभा पानतावने, रमाबाई वानखेड़े, उषा शेंन्डे, मुरलीधर कारस्कर, सुर्यभान तिजारे, नामदेव होले, शेख सुलेमान, खातुमभी शेख, रमेश हारगुळे आदीने उपस्थित राहुन मागणी रेटुन धरली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com