आंतरराज्यीय अट्टल घरफोडी गुन्हेगारांना अटक एकुण १८,६९,१८० /- रू. चा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामिण कारवाई

नागपूर :-पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण विशाल आनंद यांनी नागपूर ग्रामीण हद्दीत वाढत्या घरफोडीचे गुन्हयांना आता बसण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून गुन्हे उमडकीस आणण्याबाबत सक्त सूचना निर्गमित केल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा ना.ग्रा. यांचे विविध पथक तयार केले.

स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण वे पथकास मिळालेल्या गोपनिय माहिती व तांत्रिक तपासातून निष्पन्न झाले की, जिल्हयात वाढलेले जास्तीत जास्त परफोडीचे गुन्हे हे सराईत गुन्हेगार मोहम्मद शहबाज उर्फ मुंगरू मोहम्मद सलीम अन्सारी व मोहम्मद जुबैल उर्फ जाबीर बरकतअली हैदरी यांनीच केलेले आहेत. अशी माहिती मिळाल्यावरून त्यांचा शोध सुरू असतांना तो राजस्थान येथे असल्याची माहिती प्राप्त झाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या ०२ पथक राजस्थान येथील जिल्हा वारन गाव रामनगर तालुका चिपावारोड येथे जावुन सापळा रचुन आरोपींना शिफातीने ताब्यात घेतले व गुन्हयांबाबत विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने प्रथम सावनेर येथील एक घरफोडी केल्याचे कबुल केले. त्यावरून त्यांना पोस्टे सावनेर अप.क्र. २१०/२३ कलम ४५४, ३८० ३४ भादव अन्वये गुन्हयात अटक केली. त्याचे जवळुन काही माल त्या गुन्हयातील जप्त केला. व सदर गुन्हयात आरोपींना न्यायालयात हजर करून ०५ दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला. पोलीस कस्टडी मध्ये असतांना आरोपींनी या गुन्हयासोबत इतरही १६ गुन्हयांची कबुली दिली. व त्यांनी सदर गुन्हयातील मुद्देमाल सलाउद्दीन वल्द समसुद्दीन पठान वय ३१ वर्षे रा. वार्ड नं. ९ इस्माईलपुरा कामठी याचे माध्यमातून योगेश दामोदर श्रीरंग वय ३५ वर्षे रा. रामेश्वर होमने यांचे घरी किरायाने वार्ड क्र. २ येरखेडा कामठी यास विकल्याचे दोन्ही आरोपीतांचा समुद्र गुन्हयात अटक करून गुन्हयात कलम ४१२ भादंवि वाढवुन त्यांचा सुध्दा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला.

सदर गुन्हयात अटक आरोपी १) मोहम्मद शहबाज उर्फ घुंगरू मोहम्मद सलीम अन्सारी वय ३१ वर्षे रा. कादर झेड़ा चौक जुनी खलासी लाईन कामठी, (गुन्हयातील मुख्य आरोपी ) २) मोहम्मद जुबेल उर्फ जावीर बरकत अली हैदरी वय २५ वर्षे रा. आझाद नगर, ड्रेगन पॅलेस च्या मागे नविन कामठी, ३) सलाउद्दीन वल्द समसुद्दीन पठान वय ३१ वर्षे रा. वार्ड नं. ९, इस्माईलपुरा कामठी, ४) योगेश दामोधर श्रीरंग वय ३५ वर्षे रा. रामेश्वर होमने यांचे घरी किरायाने वार्ड क्र. २ येरखेडा कामठी यांना ताब्यात घेवुन त्यांना विश्वासात घेवुन त्यामधील मुख्य आरोपी मोहम्मद शहबाज उर्फ मुंगरू मोहम्मद सलीम अन्सारी व मोहम्मद जुबेल उर्फ जावीर दरकतअली हैदरी यांना सखोल विचारपुस केली असता त्यांनी नागपूर ग्रामीण जिल्हयात खालील नमुद गुन्हे केल्याची कबुली दिली.

पोस्टे खापरखेडा – ०१. नरखेड ०३. कुही ०४. काटोल ०४, सावनेर ०१. मौदा- ०१. बुटीबोरी-०१, अरोली पारशिवनी ०१ तसेच वर्धा जिल्हयातील ०३ गुन्हे व मध्यप्रदेश येथील सिवनी ०१. जिल्हयातील ०१ गुन्हा अशा एकूण २१ गुन्हयांची कबुली आरोपीतांकडुन मिळाली असुन एकुण १५ गुन्हयातील नागपूर ग्रामीण जिल्हयातील खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सोन्याच्या दागिण्यांची वितळवून तयार केलेली लगड ३१ तोळे १ ग्रॅम एकुण कि. १७.३८६८०/- रु. ०१ मोटार सायकल कि. ८०,०००/- रू.०६ मोबाईल संघ कि. २६,०००/- रु. ०१ टॅब १५,०००/- रु. नगदी ९,०००/- रु. सोने मोजण्याचे यंत्र ५००/- व कुलूप तोडण्याचे लोखंडी टॉमी असा एकुण १८,६९,१८०/- रु चा माल जप्त करून पोलीस स्टेशन सावनेर यांचे ताब्यात देण्यात आला.

आरोपींना वरील नमुद गुन्हयांमध्ये अटक करून पोलीस कस्टडी रिमांड मेवुन उत्वरीत मुद्देमाल हस्तगत करण्यात येत आहे. तसेच अजुनही काही गुन्हे आरोपीतांनी केले असल्यास गुन्हे उप करण्याचे प्रयत्न सुरू आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद (भा.पो.से.) नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर, अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  ओमप्रकाश कोकाटे, सहा पोलीस निरीक्षक अनिल राऊत, राजीव कर्मलवार, आशिषसिंग ठाकुर, पोलीस हवालदार विनोद काळे, इक्वाल शेख, ज्ञानेश्वर राऊत, रोशन काळे, पोलीस नायक विरेंद्र नरड, रोहन डाखोरे, विपीन गायधने, अभिशेख देशमुख, सतिश राठोड, स्वाती हिंडोरिया, चालक अमोल कुथे, मुकेश शुक्ला यांचे पथकाने केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अपहृत झालेल्या अल्पवयीन मुलीचा ४८ तासाचे आत घेतला शोध, स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई

Sat Apr 29 , 2023
नागपूर :- दि. २५/०४/२०२३ रोजी एमआयडीसी परीसर, पोस्टे उमरेड हद्दीतून फिर्यादीचा अल्पवयीन लहान बहीण १० वर्षीय अपहृत अल्पवयीन मुलगी हिला कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावुन पळवून नेल्याबाबत तक्रार पोलीस ठाणे उमरेड येथे प्राप्त झाली. प्राप्त तक्रारीची दखल घेवून अज्ञात आरोपीविरुध्द पोस्टे उमरेड येथे अप क्र. २५१/२३ कलम ३६३ भादवि. अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता… सदर गुन्हयाचा तपास हा वरीष्ठांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com