संदीप कांबळे ,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 8:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शिरपूर गावातील कुर्सी कंपनीच्या मागे असलेल्या वीट भट्टीलगत शेतात एका 18 वर्षीय तरुणीवर बळजबरीने झालेल्या लैंगिक अत्याचारात पीडित तरुणी गर्भवती झाल्याची घटना उघडकीस आली असून यासंदर्भात पीडित फिर्यादी 18 वर्षीय तरुणीने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून नराधम आरोपी निरंजन उर्फ अर्जुन माहूरे वय 23 वर्षे रा धारगाव, पावनगाव तालुका कामठी विरुद्ध भादवी कलम 376(2),(एन),आईपीसी सहकलम 4,6,8 व 12 पोक्सो कायदा 2012 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अजूनही अटकेबाहेर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पसार आरोपीने सदर पिडीत तरुणीशी ओळख करून ऑक्टोबर 2023 ते डीसेंबर 2023 दरम्यान सदर घटनास्थळी नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने पीडित तरुणी गर्भवती झाली.यासंदर्भात पिडीत 18 वर्षीय तरुणीने नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पीडितेची वैद्यकीय तपासणी करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.