राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतले संत गजानन महाराजांचे दर्शन

  बुलडाणा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरास भेट देऊन समाधीचे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.
राज्यपाल  भगतसिंह कोश्यारी यांनी दुपारी चार वाजता मंदिरास भेट दिली. पोलिसांच्या मानवंदनेनंतर त्यांनी मंदिरातील गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी राममंदिर, तसेच महाराजांच्या गादीचे दर्शन घेतले. तत्पूर्वी संस्थानच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे  मंत्रोच्चारात औक्षण करण्यात आले.  तसेच संस्थानचे विश्वस्त निळकंठ पाटील यांनी राज्यपाल यांचा सत्कार केला. तसेच राज्यपाल यांना श्री गजानन महाराजांची मुर्ती भेट दिली.  यावेळी आमदार डॉ. संजय कुटे, आकाश पुंडकर, श्वेता महाले, संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, संस्थानचे विश्वस्त निळकंठ पाटील आदी उपस्थित होते .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

चला, नागपूर ड्रग्जमुक्त करु या! - डीसीपी चिन्मय पंडित

Fri Jul 8 , 2022
– अमली पदार्थावरील ‘वेब चर्चेत ‘ आवाहन नागपूर : अमली पदार्थाचा विळख्यात तरुणाई गोवल्या गेली आहे. ड्रग्ज सारख्या अंमली पदार्थाचे सेवन,वाहतूक, विक्री आदी व्यवसायात तरुण मुलांसोबत मुलीसुध्दा अडकल्या आहेत. महानगरासोबत ग्रामीण भागात सुध्दा हा विळखा घट्ट होत आहे. त्यामुळे जागरूक नागरिक म्हणून पोलिसांसोबत हातभार लावूया, चला नागपूर ड्रग्जमुक्त करु या ! असे  आवाहन नागपूरचे पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) चिन्मय पंडित यांनी आज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com