संदीप कांबळे, कामठी
50 झोपड्या जळल्या
नुकसांनग्रस्तांना त्वरित नुकसानभरपाई द्या-पालकमंत्री नितीन राऊत
कामठी ता प्र 9:- नागपूर ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या बेलतरोडी येथील वन विभागाच्या जागेवर असलेल्या झोपड़पट्टीत आज सकाळी 10 दरम्यान सिलेंडर स्फोट झाल्याने भीषण आग लागली. या आगीत परिसरात असलेल्या 50 झोपड्या जळून खाक झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यान या आगीमध्ये परिसरातील घरांमधील तब्बल 16 सिलेंडरचा स्फोट झाला. तर जवळपास 10 च्या वर नागरिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाच्या वतीने अग्निशमन वाहन बोलावून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला ज्यामध्ये प्रशासनाला आलेल्या यशाने जीवितहानी टळली असली तरी 10 च्या जवळपास नागरिक जळून जख्मि झाले आहेत.याप्रसंगी घटनास्थळी पालकमंत्री नितीन राऊत, जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर, जिल्हाधिकारी आर विमला, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार तसेच आदी प्रशासनिक अधिकाऱ्यानी भेट दिली.दरम्यान पालकमंत्री नितीन राऊत सह माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर यांनी नागरिकांशी संवाद साधून विचारपूस केली व झालेंल्या घटनेसंदर्भात चिंता व्यक्त करून नागरिकांचे सांत्वन केले.याप्रसंगी पालकमंत्री नितीन राऊत यांनी या आगीच्या घटनेत नुकसान झालेंल्या नुकसानग्रस्त नागरिकाना त्वरित नुकसानभरपाई देण्याचे आदेश उपस्थित प्रशासनिक अधिकाऱ्यांना दिले.