अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीविरूद्ध कारवाई, वाहनासह एकूण २०,२५,०००/-रूपयाचा मुद्देमाल जप्त

नागपूर :-दिनांक १९/०४/२०२३ रोजी जिल्हा वाहतुक शाखा नागपूर ग्रामीण येथील स्टाफ हा शासकीय वाहनाने कन्हान उपविभागातील पोस्टे मौदा हद्दीमध्ये पोलीस निरीक्षक जिल्हा वाहतुक शाखा नागपूर ग्रामीण यांचे आदेशान्वये पेट्रोलिंग व अवैध रेती वाहतुक करणान्यांवर कारवाई करणेकामी दिनांक १९/०४/२०२३ रोजी सकाळी ६.५० वा. दरम्यान पेट्रोलिंग करत असतांना गुप्त बातमीदारांकडुन खायौशीर माहिती मिळाली की, एक ट्रकमध्ये अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून जिल्हा वाहतुक शाखा नागपूर ग्रामीण येथील स्टाफ यांनी मौदा येथील बोरगाव पुलाजवळ नाकाबंदी करीत असतांना एक ट्रक प्राप्त माहितीप्रमाणे नागपूरचे दिशेने येतांना दिसुन आले. सदर ट्रकला थांबण्याचा इशारा देवुन धाबविले असता ट्रक क्र. एम. एच-३६ / एफ-३०७५ यामध्ये चालक आरोपी नामे- प्रशांत सुखदेव मारबते, वय ३५ वर्ष, रा. खैरी वेटाला ता. भंडारा जि. भंडारा यास त्याचे ट्रकमध्ये असलेल्या मुद्देमालाबाबत विचारले असता, त्याने सदर ट्रकमध्ये रेतीचा मुद्देमाल भरल्याचे सांगितले. त्यास सदर रेतीबाबत परवाना रॉयल्टी विचारले असता त्याने त्याबाबत कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. सदर ट्रक कोणाचे मालकीचे आहे व त्याने सदर ट्रकमध्ये कोणाच्या सांगणेवरून चोरीची रेती ट्रकमध्ये भरून वाहुन नेत असल्याबाबत विचारणा केली असता स्वतः ट्रकमालक असुन स्वतःच अवैधरीत्या विनापरवाना चोरीची रेतीची वाहतुक करतांना मिळुन आल्याने त्याचेजवळून रेतीसह एक पिवळया रंगाचा दहाचाकी ट्रक क्र. एम. एच. ३६ / एफ- ३०७५ किंमती अंदाजे २०,००,०००/- रू. ज्यामध्ये अंदाजे ०५ ब्रास रेती भरलेली किमती अंदाजे २५,०००/- रु. असा एकुण वाहनासह २०,२५,०००/- रु. किमतीचा मुद्देमाल आरोपीकडुन जप्त करण्यात आलेला आहे.

सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे नापोशि/ १९२७ शंकर मडावी वाहतुक शाखा नागा यांचे रीपोर्टवरून पोलीस स्टेशन मौदा येथे आरोपीविरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला असुन आरोपीला जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई करीता पोस्टे मौदा यांचे ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोस्टे मौदा हे करीत आहे.

सदरची कार्यवाही ही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतुक शाखा नागपूर ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक विजय माहुलकर यांचे नेतृत्वात चालक सहायक फौजदार सुधीर यादव, चालक पोलीस हवालदार गुरुचरणसिंग जब्बल, पोलीस हवालदार मंगेश काळे, विजय तायडे, पोलीस नायक शंकर मडावी, प्रणय बनाफर, पोलीस शिपाई अमित मेहरे, कार्तिक पुरी, यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जबरी संभोग करणाऱ्या आरोपीला कोर्टातून शिक्षा

Thu Apr 20 , 2023
बेला :-पो.स्टे. बेला यातील फिर्यादी यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. बेला येथे अप. क्र. ११/२०२० कलम ३६३, ३७६ (२) (एन), ३७६ (३), ५०६ भादवि सहकलम ४, ६ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. यातील फिर्यादीच्या अल्पवयीन बहिणीला कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले. अशा फिर्यादीच्या तोंडी रोपोर्ट वरून सदर गुन्हा नोंद झाला होता. तपासा दरम्यान आरोपी नामे- विशाल ज्ञानेश्वर बिरसागर, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com