संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत घेण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान 3 मध्ये कामठी नगर परिषद ने 50 हजार ते 1 लक्ष लोकसंख्या या गटामध्ये राज्यातून 14 वा क्रमांक पटकाविला आहे.5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबई येथे आयोजित समारंभामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते या अभियानाचा निकाल जाहीर करण्यात आला.
सदर अभियानामध्ये कामठी नगर परिषदेने निसर्गाच्या भूमी,वायू,जल,अग्नी व आकाश या पंचभूतांतर्गत पर्यावरणाचे संरक्षण ,संवर्धन व जतन करण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. ज्यामध्ये वृक्षारोपण,घनकचरा संकलन ,प्लास्टिक बंदी,कापडी पिशव्यांचे वाटप,इलेकर्ल्ट्रीक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन ,गणेश विसर्जनसाठी कृत्रिम कुंड,एलईडी पथदिवे, वैद्यकीय कचरा व ई कचरा व्यवस्थापन, निर्माल्य, जनजागृती साठी आयोजित स्पर्धा,रंगरंगोटी,पथनाट्य,कार्यशाळा इत्यादी उपक्रम राबविण्यात आले.
सदर अभियान नगर परिषद मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या नेतृत्वात अभियंता वीरेंद्र ढोके,स्वास्थ्य निरीक्षक विजय मेथीयां,अमोल कारवटकर आदींनी राबविले.सदर अभियान हे कामठी नगर परिषद चे पदाधिकारी,नगरसेवक व शहरातील सुजाण नागरिकांच्या सहाय्यानेच यशस्वी राबविण्यात आले व येणाऱ्या काळात सुदधा अश्याच पद्धतीचे पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविणार आहेत अशी माहिती मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी दिली.