13 मार्चच्या मॅरेथॉनसाठी नोंदणी करा – जिल्हाधिकारी

माय-लेकीच्या ‘ब्रेक द बायस’ लढयासाठी नागपुरात 50 हजाराचा समुदाय धावणार
नागपूर  : ‘ब्रेक द बायस ‘ अर्थात भेदभाव सोडा या संदेशासाठी 13 मार्चला नागपुरात 5 किलोमिटर मॅराथॉन दौड आयोजित करण्यात आली आहे.ऑनलाईन मोफत नोंदणीसाठी आज जिल्हा प्रशासनाने लिंक जाहीर केली आहे. अधिकाधिक संख्येने घराघरातील मायलेकीने यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी आर विमला यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनाने आज यासंदर्भातील लिंक जारी केली आहे. या लिंक वर गेल्यानंतर या स्पर्धेतील आपली नोंदणी होणार आहे. मोठ्या प्रमाणात बक्षिसे देखील ठेवण्यात आली आहे. लिंक पुढील प्रमाणे आहे https://forms.gle/aj४DTYYMDhuoULwa6 ही मॅरेथॉन स्पर्धा संविधान चौकातून आरंभ करून विधानभवन रस्त्याने, जपानी गार्डन, वॉकर स्ट्रीट, रामगिरी, जिमखाना व्हीसीए चौक या 5 किलोमीटरच्या मार्गाने होईल. स्पर्धेचा समारोप संविधान चौकात होईल.
‘ब्रेक द बायस ‘ , ‘रन फॉर इक्वॅलिटी ‘ तसेच वाढत्या अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी सीट बेल्ट व हेल्मेट वापरा, स्पीडवर नियंत्रण ठेवा या संदेशासह ‘रन फॉर सेफ्टी ‘ वर आधारित फक्त महिलांसाठी ही स्पर्धा असेल. सकाळी सात ते आठ या कालावधीमध्ये हे आयोजन असेल. मॅरेथॉन स्पर्धेत शाळेमधील 8, 9 व 11 व्या वर्गातील फक्त मुली व त्यांच्या माता सहभागी होतील, तसेच महाविद्यालयीन तरुणींना देखील यामध्ये सहभागी होता येईल ,अशी माहिती जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिली. https://forms.gle/aj४DTYYMDhuoULwa6 या लिंक वर सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आजची महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत सर्व क्षेत्रात यश पादांक्रीत करीत आहे-ऍड सुलेखाताई कुंभारे

Tue Mar 8 , 2022
– संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 7 :- स्त्री म्हणजे लाजाळू,दुबळी व भावनिक असा समाजात गैरसमज आहे .परंतु वेळ पडल्यास हीच घरातील स्त्री बिकट परिस्थितीला तोंड देऊन यशस्वी जीवनाची वाटचाल सुद्धा पार पाडते हे सगळे शक्य झाले आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे व संविधानाने दिलेल्या हक्कामुळेच, आजची स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आघाडी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com