पीओपी मूर्तीसंदर्भात मनपाची धडक कारवाई ११७ मूर्ती केल्या जप्त

– १० हजार रुपये दंड वसूल

नागपूर :- यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा याकरिता नागपूर महानगरपालिका आग्रही आहे. पीओपी मूर्तींच्या विक्रीसंदर्भात नागपूर महानगरपालिकेद्वारे संपूर्ण शहरात धडक कारवाई सुरू करण्यात आली असून, सोमवार (ता. ११) रोजी बजेरिया चौक येथील शाहू मूर्ती भंडार यांच्यावर कारवाई करीत ११७ पीओपो मूर्ती जप्त करण्यात आल्या व मूर्ती विक्रेत्यांकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

महानगरपालिकेने पी.ओ.पी. मूर्तींवर बंदीच्या संदर्भात केन्द्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ व राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करीत आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार पीओपी मूर्तींच्या विक्री संदर्भात कारवाई केल्या जात आहे.

मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांना पी.ओ.पी. मूर्तीं विक्री संदर्भात मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सोमवार (ता. ११) रोजी बजेरिया चौक येथील प्रशांत शाहू यांच्या मालकीच्या शाहू मूर्ती भंडार यांच्यावर धडक कारवाई करण्यात आली. स्वच्छता विभागाचे विभागीय अधिकारी रोहिदास राठोड, गांधीबाग झोनचे सुरेश खरे, नवकिसन शेंडे, लोकेश बासलवार, उपद्रव शोध पथक सिव्हीलचे संजय खंडारे, गणेशपेठ पोलीसे ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेद्र आंभोरे यांच्या चमूने ही धडक कारवाई केली.

या वेळी पारंपारिक मुर्तिकार सुरेश पाठक व  चंदन प्रजापती प्रामुख्याने उपस्थित होते. दुपारी सुरू झालेली कारवाई जवळपास चार तास चालली. यादरम्यान येथील मूर्तींची तपासणी करण्यात आली व पीओपोच्या ११७ मूर्ती जप्त करण्यात आल्या व मूर्ती विक्रेत्यांकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सद्भावना सांस्कृतिक क्रिडा मंडल एवं बहुउद्देशीय संस्था, नागपुर द्वारा आयोजित छापरूनगर चौक येथे दहीहांडी उत्सव

Tue Sep 12 , 2023
नागपूर :- सद्भावना सांस्कृतिक क्रिडा मंडल एवं बहुउद्देशीय संस्था, नागपुर द्वारा आयोजित छापरूनगर चौक येथे दहीहांडी उत्सव 2023या कार्यक्रमात प्रामुख्याने केंद्रीय मंत्री   नितिन गडकरी,व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. आमदार प्रविण दटके, कृष्णा खोपडे, मोहन मते, विकास कुंभारे, गिरीष व्यास हे प्रामुख्याने उपस्थित होते. या दहीहांडी उत्सव 2023 चे आयोजक नरेंद्र (बाल्या) बोरकर, महामंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!