मेट्रो मजुरावर दिवाढवळ्या दरोडा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी-नागपूर महार्गावरील ईडन ग्रीन हॉटेल समोरून मेट्रो मजूर पायी पायी जात असता मागेहून दुचाकीने आलेल्या तीन दरोडेखोरांनी चाकूसदृश्य वस्तू ची भीती दाखवून,कॉलर पकडून त्याच्याकडील 8 हजार 500 रुपये हिसकावल्याची घटना काल दिवसाढवळ्या साडे चार दरम्यान घडली असून यासंदर्भात लुबाडणूक झालेला फिर्यादी सुरजकुमार गुप्तां वय 25 वर्षे रा राज रॉयल मागे येरखेडा कामठी ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 392,34 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पीडित मजूर फिर्यादी हा नागपूर मेट्रो च्या कामात मजूर पदावर कार्यरत असून सदर घटना वेळी पूर्वी ठेकेदार ला त्याच्या राहत्या घरी सोडून पायी पायी जात असता वक्रदृष्टी ठेवून असलेल्या सदर आरोपीने काळ्या रंगाची दुचाकी एम एच 31 -8933 ने येऊन संगनमताने या मजुराची चाकू सदृश्य वस्तूच्या धाकावर त्यांच्याकडील 8 हजार 500 रुपयाची लुबाडणूक केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विरोधकांचा मोदी सरकारविरोधात ‘व्होट जिहाद’! - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पश्चिम बंगालमधील सभांमध्ये गंभीर आरोप

Sat May 4 , 2024
कृष्णानगर :- दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता उघडपणे मोदींविरोधात व्होट जिहादचे आवाहन करत आहेत. अनेक दशकांपासून देशात पडद्याआडून सुरू असलेला जिहादचा हा खेळ नैराश्यग्रस्त विरोधकांकडून उघडपणे सुरू झाला असून विकसित भारतासाठी मतदान करून देशातील जनता त्याला योग्य उत्तर देईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. व्होट जिहादच्या या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com