10वी आणि 12वीच्या वेळापत्रकाबाबत अद्याप घोषणा नाही

– समाजमाध्यमाहून प्रसारित होणारे वेळापत्रके चुकीचे

नागपूर :- फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) च्या लेखी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रके महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च मा‍ध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाहीत, असे स्पष्टीकरण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत समाजमाध्यमाहून प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती चुकीची असून ग्राह्य धरण्यात येऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

काही संकेतस्थळाहून फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांची वेळापत्रके जाहीर करण्यात आली असल्याबाबतची बातमी समाजमाध्यमांहून प्रसारित झाली आहे. याबाबत मंडळाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यानुसार समाजमाध्यमांहून प्रसिद्ध करण्यात आलेली फेब्रुवारी-मार्च 2025च्या इ.10वी व 12वी परीक्षांचे वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. या परिक्षांची सविस्तर विषयनिहाय वेळापत्रके स्वतंत्रपणे मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येतील. याची सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व अन्य घटकांनी नोंद घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.

मंडळाचा लोगो अथवा नावाचा वापर करुन परिक्षेबाबत चुकीची माहिती प्रसारित करुन पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्यामध्ये संभ्रम निर्माण केल्यास त्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त भाजपतर्फे अभिवादन

Thu Oct 17 , 2024
नागपूर :- महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी १७ ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे अभिवादन करण्यात आले. भाजप प्रदेश प्रवक्ते व उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी धरमपेठ वाल्मिकी धाम येथील महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करुन वंदन केले. याप्रसंगी अशोक मेंढे, सुभाष पारधी, डॉ. मिलिंद माने, संदीप जाधव, संजय बंगाले, विनोद कन्हेरे, दिलीप गोईकर, अनंत जगनीत, उषा पायलट, इंद्रजीत वासनिक, बबलू […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!