पोलीस स्टेशन उमरेड येथील WCI, मकरधोकडा येथील RVR कन्स्ट्रक्शन कंपनी येथील लोखंडी प्लेटा चोरी करणाऱ्या आरोपीतांना एकूण १०९५०००/- रू. चे मुद्देमालासह अटक

– स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई

उमरेड :-पोलीस स्टेशन उमरेड अंतर्गत मौजा हेवती शिवार येथे दिनांक १७/०१/२०२४ ने २०.०० वा. ते दि. १८/०१/२०२४ ते १०.०० वा. दरम्यान फिर्यादी नामे- मुकंद गणेशचंद्र सैयहीया यांचे उदासा परिसरात कन्वेयर बनविण्याकरीता लागणारे लोखंडी बेल्टस ३ बाय ५ फुटाच्या लांबी रुंदीच्या वजन प्रत्येकी ४५ किलोच्या ४५ नग प्लेटा प्रत्येकी किंमती अंदाजे १०००/- रू. असा एकुण ४५०००/- रू मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरी करून नेल्याचे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे उमरेड येथे अप क्र. १२/२४ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.

सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत असतांना दि. १८/०१/२०२४ रोजी उमरेड उपविभागात खाजगी वाहनाने बाईक चोरी व मालमत्तेचे गुन्हयातील आरोपीचा शोध करीत असता गोपनीय बातमी व्दारे माहीती मिळाली की टाटा गाडी क्र. MH 31 CQ 3751 या गाडी मध्ये WCL मकरधोकडा येथिल RVR कंस्ट्रक्शन कंपनीचे आवारातून चोरी गेलेल्या लोखंडी प्लेट उदासा येथून गायकवाड याचे कवाडी दुकानातून टाटा एस गाडीतून गाडी क्र. MH 31 CQ 3751 मध्ये लोड करून नागपूरकडे येत आहे. अशी माहिती मिळाल्याने लगेच स्थानिक गुन्हे शाखा येथील पथकाने बंपा टोल नाका येथे नाकाबंदी केली असता मिळालेल्या माहितीनुसार गाडी येतांना दिसल्याने गाडी थांबवून गाडीची तपासणी केली असता गाडी मध्ये पोस्टे उमरेड अप. क्र. १२/२४ कलम ३७९ भादंवि गुन्हयात चोरी गेलेल्या लोखंडी प्लेट दिसून आल्याने आरोपी नामे १) सुभाष महादेव हुमने वय २९ वर्ष रा. नंदनवन झोपडपट्टी नागपुर व आरोपी कवाडी दुकानदार गायकवाड रा. उदासा त्यांना अधिक विचारपुस केली असता त्याच्या ताब्यातील टाटा एस गाडीने WCL मकरचोकडा येथिल RVR कंस्ट्रक्शन कंपनी मध्ये जावून सदरचा गुन्हा केल्याचे सागितले. आरोपींचे ताब्यातून १) ४५ लोखंडी एलेट प्रत्येकी ४५ किलो प्रत्येकी किंमती १०००/-रू. एकूण किंमती ४५०००/-रु. २) इतर कबाडी समान लोखंडी प्लेट अँगल, लोखंडी दरवाजा, लोखंडी साखेळी व मशीनचे पार्ट किंमती ५००००/-रू. ३) टाटा ११०९ क. MH 31 CQ 3751 किंमती १०,००,०००/-रू. असा एकूण १०९५०००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला व गुन्हा उड़कीस आणला आरोपी, मुद्देमाल व कागदपत्रे पुढील तपास प्रक्रियेकरिता पोलीस स्टेशन उमरेड यांच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई नागपुर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से), अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक आशीष मोरखडे, पोलीस हवालदार अरविंद भगत, गजेंद्र चौधरी, पोलीस अंमलदार राकेश तालेवार यांचे पथकाने केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीस अटक, वाहनासह एकूण ३०,४०,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त

Sat Jan 20 , 2024
– पोलीस स्टेशन भिवापूरची कारवाई भिवापूर :-दिनांक १८/०१/२०२४ रोजी रात्री २२.३० वा. दरम्यान पोलीस भिवापूर येथील स्टाफ पोलीस स्टेशन भिवापूर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, १२ चक्का टिप्पर ट्रक क्र. MH-40/CM- 6475 मध्ये निलज फाट्याकडून भिवापूरकडे अवैधरित्या विनापरवाना रेतीची वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या विश्वसनिय माहिती वरून नमुद घटनास्थळी नाकाबंदी केली असता १२ चक्का टिप्पर ट्रक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com