– पोलीस स्टेशन भिवापूरची कारवाई
भिवापूर :-दिनांक १८/०१/२०२४ रोजी रात्री २२.३० वा. दरम्यान पोलीस भिवापूर येथील स्टाफ पोलीस स्टेशन भिवापूर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, १२ चक्का टिप्पर ट्रक क्र. MH-40/CM- 6475 मध्ये निलज फाट्याकडून भिवापूरकडे अवैधरित्या विनापरवाना रेतीची वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या विश्वसनिय माहिती वरून नमुद घटनास्थळी नाकाबंदी केली असता १२ चक्का टिप्पर ट्रक क्र. MH-40/CM-6475 हा येताना दिसला, त्याचा पाठलाग करून इंडियन ऑइल पेट्रोलपंप जवराबोडी शिवार येथे थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये अंदाजे २८ ब्रास रेती मिळून आल्याने ट्रक चालक नामे सुरेश गुजोबा रावते, वय ४२ वर्ष, रा. पाचगाव तालुका उमरेड जि. नागपूर यास सदर ट्रक मधील रेतीचे रॉयल्टी बाबत विचारले असता त्याने रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने व सदरची रेती ही चोरीची असल्याची खात्री झाल्याने आरोपीचे ताब्यातून टिपर ट्रक क्र. MH-40/CM- 6475 किंमती ३०,००,०००/- रू. व त्यामध्ये ०८ ब्रास रेती किमती ४०,०००/-रू. असा एकूण ३०,४०,०००/-रु. चा मुद्देमाल जप्त करून सदर टिप्पर चालक व मालक नामे विनोद मिसाळ वय ४५ वर्ष, रा. नागपूर यांचेविरुद्ध कलम ३७९, १०९ भा.द.वी. सहकलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमिन महसुल स. सहकलम ४. २१ खाणी आणि खनिजे अधिनियम १९५७ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४
अन्वये पो. स्टे. भिवापूर येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नागपूर (ग्रामीण) हर्ष पोद्दार (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले साहेब यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड विभाग, ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक संदीप सदमेक, पोलीस हवालदार राकेश त्रिपाठी, निलेश खोब्रागडे पोलीस अंमलदार रवी वानखेडे, चालक पोलीस हवालदार गातेश बांते यांनी केली.