कामठी तालुक्यात तुकडाबंदीला शोधली पळवाट

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 11 : कामठी तालुक्यातील शहरालगतच्या गावात प्लॉटिंग मध्ये असलेली जुनी व नवी गुंतवणूक तुकडाबंदीच्या कचाट्यात सापडली आहे त्यामुळे एकरी जमिनीचे व्यवहार करून त्यात आठ ते दहा प्लॉटचे मार्किंग कारण्याचा उपाय काही ठिकाणी शोधला आहे. एन ए 44 नसलेल्या जागांची रजिस्ट्री बंद असताना हा प्रकार सुरू असल्याची चर्चा जोमात रंगत आहे.

राज्य मुद्रांक विभागाने तुकडा बंदी नियमांचे परिपत्रक काढल्यामुळे एन ए 44 (अकृषक जमिनी आणि नॉन एग्रीकल्चर) वगळता इतर सर्व घरे, जागा, प्लॉटची रजिस्ट्री मागील काही महिन्यापासून बंद आहे परिणामी हवाला पद्धतीसारख्या मुद्रांकावर (ब्राण्ड)मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांचा सपाटा सुरू असतानाचा आता काही बहादूरानी तुकडाबंदीला पळवाट शोधली आहे.मुद्रांकावरील व्यवहारांना बँकेचे कर्ज मिळत नाही तसेच नगररचना प्राधिकरनाच्या धोरनानूसार भविष्यात मालमत्तावर गदा येण्याची शक्यता असली तरी ब्रॅंडवरील व्यवहार धुमधडाक्यात सुरू असताना आता एकरात 10 ते 12 जणांची भागीदारी करून सातबारानुसार खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू झाल्याची चर्चा आहे.या व्यवहारामुळे ग्रीन झोन मध्ये अनधिकृत बांधकामे वाढण्याचा धोका असून अशा प्रकरणाचा महसुलसह नोंदणी व मुद्रांक विभाग कसा शोध घेणार असा प्रश्न उभा होऊन ठाकला आहे .

मागील काही महिन्यांपासून तुकडाबंदीमुळे गावठाण वसाहतीसह शहरालगतच्या एन ए नसलेल्या सर्व वसाहतीमधील प्लॉट व जुन्या बांधकामाचे व्यवहार ठप्प आहेत.तसेच ज्या सोसायटीमध्ये घर व प्लॉट चे व्यवहार करायचे आहेत ते सुदधा थांबवले आहेत.काही व्यवहारामध्ये बँकेचे कर्ज मंजूर झाले मात्र दस्त नोंदणी होत नसल्यामुळे संबंधितांनी कर्ज काढण्यासाठी केलेली धावपळ व्यर्थ ठरत आहे.

अशा आहेत तुकडबंदी तरतुदी

एखाद्या सर्व्हे नंबर चे क्षेत्र दोन एकर असेल तर त्यातील एक किंवा तीन गुंठे जागा विकत घेता येत नाही.जमिनीचे अधिकृत ले आउट करून घेतले तरच रजिस्ट्री होईल .प्रमाणापेक्षा कमी क्षेत्र असेल तर त्याच्या खरेदी विक्रीसाठी जिल्हाधिकारीच्या परवानगीची गरज असेल एखाद्या जागेच्या तुकड्याच्या भूमी अभिलेख विभागाकडून स्वतंत्र मोजणीचा नकाशा असेल तर त्याच्या विक्रीसाठी परवानगी ची गरज नसेल मात्र त्याचे विभाजन करण्यासाठी तुकडाबंदीचे नियम लागू असतील अशी तरतूद आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सहा महिन्यांचा प्रगती अहवाल सादरीकरण.

Sun Sep 11 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 11 :- 7 सप्टेंबर 2022 रोजी, एस.के. पोरवाल कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, कामठी येथे रसायनशास्त्र पदव्युत्तर विभागातील सहा महिन्यांचा प्रगती अहवाल/सादरीकरण आयोजित करण्यात आले. नोंदणीकृत संशोधन अभ्यासकांनी आर ए सी सदस्यांसमोर त्यांचे सादरीकरण केले. डॉ.(सौ.) ए.आर. चौधरी आरएसी सदस्य म्हणून आणि समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ.व्ही.एन.चव्हाण यांनी सादरीकरणाचे मुल्यांकन केले. याप्रसंगी डॉ.ए.आर. चौधरी यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com