– कलावंतांच्या स्वागतासाठी विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी सज्ज – डॉ.नितीन धांडे
– प्रा.राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, बडनेरा येथे होणार यावर्षीचा युवा महोत्सव
अमरावती :- १० ते १३ ऑक्टोबर दरम्यान प्रा.राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च,बडनेरा येथे यावर्षीचा युवा महोत्सव पार पडणार आहे.युवा महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कला प्रकाराचे उत्कृष्ट सादरीकरण करून भविष्यात नावलौकिक मिळवावा यासाठी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी कलावंताच्या स्वागतासाठी सज्ज असल्याची माहिती विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ.नितीन धांडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
युवा महोत्सव पहिल्यांदाच प्रा. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च,बडनेरा मध्ये होत असल्यामुळे यासंदर्भात डॉ.नितीन धांडे आणि विद्यापीठ प्रशासनाने अधिक माहिती देतांना सांगितले की संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने अखिल भारतीय विद्यापीठ संघाकडून मान्यता प्राप्त कलाप्रकारांमध्ये व नियमानुसार आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव – 2023 स्पर्धेचे आयोजन दि.१० ते १३ ऑक्टोबर या कालावधीत प्रा.राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, बडनेरा येथे करण्यात आले असल्याची माहिती दिली. सदर स्पर्धेची माहितीपुस्तिका, नियमावली, सहभागी कलावंतांचे ओळखपत्र आणि महाविद्यालयाच्या संघ व्यवस्थापकाने करावयाची कार्यवाही, स्पर्धेसंदर्भात सविस्तर वेळापत्रक आणि विविध कलाप्रकारांसाठी असलेले नियम व विनियमावली, युवा महोत्सव बाबतचे नियम आदी माहिती विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व शैक्षणिक विभागांचे सर्व विभागप्रमुख यांना पत्राद्वारे व ई-मेलद्वारे पाठविण्यात आलेली आहे अशी माहिती सुद्धा डॉ.धांडे यांनी दिली.
याशिवाय सदर संपूर्ण माहिती विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावरील स्टुडन्ट डेव्हलपमेन्ट मधील स्टुडन्ट डेव्हलपमेन्ट लेटर २०२३ या शिर्षामध्ये देण्यात आली आहे.याबाबत सर्व महाविद्यालयांनी तसेच विद्यार्थ्यांनी घ्यावयाची असून त्याप्रमाणे कार्यवाही करावयाची आहे. असे विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले आहे.दि.१० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता प्रा.राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, बडनेरा येथील मुख्य रंगमंच ठिकाणी डॉ. नितीन धांडे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार असून कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे अध्यक्षस्थानी असणार आहे.या कार्यक्रमाला प्रख्यात गझल गायक भीमराव पांचाळे यांची देखिल उपस्थिती राहणार आहे सोबतच प्र.कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे उपाध्यक्ष ऍड. उदय देशमुख, कोषाध्यक्ष डॉ हेमंत देशमुख, सचिव युवराजसिंग चौधरी यांची उपस्थिती राहणार आहे, यानंतर संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन असणार आहे.
दु.१२ वाजतापासून लोकनृत्य, भारतीय समूहगान, एकांकिका, स्किट व माईम, वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा, कोलाज, स्थळ छायाचित्रीकरण, पाश्चिमात्य वाद्यसंगीत, पाश्चिमात्य एकल गायन, पाश्चिमात्य समुहगान, क्विज लेखी परीक्षा व क्विज अंतिम फेरी इ. स्पर्धा संपन्न होतील,११ ऑक्टोबर ला स. 8.30 वाजतापासून शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, भारतीय समूहगान, सुगम संगीत, एकांकिका, स्किट व माईम, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, स्पॉट पेंटींग, पोस्टर मेकिंग व फोक ऑर्केस्ट्रा इ. स्पर्धा संपन्न होतील,१२ ऑक्टोबर रोजी स. 8.30 वाजतापासून लोकनृत्य, भारतीय समूहगान, सुगम संगीत, एकांकिका, स्किट व माईम, वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा, कार्टुनिंग, क्ले-मॉडलिंग व शास्त्रीय गायन स्पर्धा तसेच १३ ऑक्टोबर, रोजी स. 8.30 वाजतापासून लोकनृत्य, स्किट व माईम, एकांकिका, मिमिक्री, सुगम संगीत, शास्त्रीय वाद्य संगीत (ताल वाद्य), शास्त्रीय वाद्य संगीत (स्वर वाद्य), मेहंदी, रांगोळी व स्थापना इ. स्पर्धा संपन्न होतील. त्यानंतर लगेचच सायं.५ वाजता युवामहोत्सवाचा समारोप होईल अशी माहिती आयोजकांच्या वतीने या पत्रपरिषदेत देण्यात आली.
यावेळी पत्रकार परिषदेला विदर्भ युथ वेलफेयर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्यासह प्र.कुलगुरू डॉ प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ.तुषार देशमुख, ऍड. उदय देशमुख,डॉ हेमंत देशमुख, सचिव युवराज सिंग चौधरी, विद्यार्थी विकासचे संचालक डॉ.राजीव बोरकर,विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर , युवा महोत्सवाचे मुख्य संयोजक डॉ.गजेंद्र बमनोटे, युवा महोत्सव 2023 चे समन्वयक प्रा.विजय काळे, प्रा. राज देशमुख, प्रा. जया इंगोले, प्रा. डॉ. निक्कु खालसा व प्रा.आशय रोकडे, डॉ.लोभस घडेकर, प्रा.स्मित ठाकुर उपस्थित होते.