संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या न्यू येरखेडा येथील दुर्गा सोसायटी रहिवासी 23 वर्षीय तरुण नवीन मिलींद मेश्राम यास डीसीपी श्रवण दत्त यांनी नागपूर शहर पोलीस आयुक्तालय व लगत असलेल्या नागपूर ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाणे खापरखेडा ,मौदा व कन्हान सीमेतून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले.
प्राप्त माहिती नुसार सदर हद्दपार तरुण नवीन बारसे हा सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक ठरेल अशा प्रकारचे कृत्य करण्यापासून परावृत्त करण्याच्या दृष्टीने तसेच त्यास महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 च्या कलम 56 (1)(अ)(ब)मधील तरतुदी नुसार त्यापरिसरातील व्यवसायिक व रहिवाशी लोकांचे मालमत्तेस इजा,भय निर्माण होऊन त्याच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. सदर इसमावर घरफोडीचे सतरा गुन्हे दाखल असून त्याच्यावर निर्दिष्ट केलेल्या सवयीमुळे परिसरात प्रचंड भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे असं कृत्य करण्यापासून बचाव करण्यास अपप्रेरणा देण्याचे बेतात असल्याचे प्रवृत्ती पासून परावृत्त करण्याच्या दृष्टीने हद्दपार करण्यात आले असून त्यास पोलीस ठाणे रामटेक येथील त्याचे नातेवाईक राजकुमार अंबादे वय 37 वर्षे रा चारगाव कडे सोडण्यात आले आहे .
ही यशस्वी कारवाही डीसीपी श्रवण दत्त ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे, प्रभारी पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे, डी बी स्कॉड चे वेदप्रकाश यादव, सुधीर कनोजिया, आशिष भुरकुंडे,श्याम गोरले,राहुल वाघमारे, सुजाता कुर्वे,अजय ठवरे यांनी केली.