नागपुर बॉयपस महामार्गवर बोरडा चौरस्ता जवळील बस स्टाप वर युवकाची हत्या

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- नागपुर जबलपुर चारपदरी महामार्ग क्र ४४ वरील बोरडा चौरस्ता बस स्टाप वर न्यु गोंडेगाव येथील होमगार्ड आशिष पाटील याची कृणाल नाईक व सहकार्याने मिळुन धारदार शस्त्र व हॉकी ने मारून चारकी वाहनात टाकुन नेऊन मृतदेह टाकत असल्याचे मध्य प्रदेश येथील पोलीसानी आशिष च्या नातेवाईकाना व कन्हान पोलीसाना कळविल्याने मृतकाचे परीवारातील मंडळी पोहचल्यावर खरी परिस्थिती सामोर येईल.

घटनेचे गांगीर्य लक्षात घेत नागपुर ग्रामिण अधिक्षक, स्थागुअ अधिकारी पथक, कन्हान थानेदार वरिष्ट पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते सखोल तपास करित असुन मध्य प्रदेश शिमेत मृतदेहअसल्यास तपास यंत्रणा अधिक सक्रिय करण्यात आली आहे.

सध्या कृणाल नाईक च्या पत्नी सोबत आशिष पटील वय २७ वर्ष राह. न्यु गोंडेगाव पुनर्वसन वसाहत नौकरी होमगार्ड यांचे त्यांचे घरासामोर राहणा-या कृणाल नाईक च्या पत्नी सोबत चक्कर असल्याचे संशयावरून मंगळवार (दि.१०) ऑक्टोंबरला दुपार च्या वेळी नागपुर जबलपुर चार पदरी महामार्ग क्र ४४ वरील बोरडा चौरस्ता कृणाल नाईक ने आशिष ला बस स्टापवर बोलावुन दोन ते तीन मित्रा च्या सहकार्या ने आरोपीने आशिष पाटील ची हत्या करून चारचाकी वाहनात टाकुन पुरवा नष्ट करण्याच्या उ़द्देशाने बरेच लांब तिरोडी कंटगी जि. बालाघाट (मध्य प्रदेश) ला नेऊन फेकत असताना तेथील पोलीसाना माहित होताच आरोपी चारचाकी वाहन सोडुन पळाले.

ही माहिती मिळाल्याने मृतक आशिष पाटील चे नातेवा़ईक घटनास्थळावर पोहचल्यावर मृतकाची ओळख पटल्यावरच पुढील कारवाई काय होणार असे बोलल्या जात आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्हा सामान्य रुग्णालयातील ए .आर. टी केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांची भेट व पाहणी

Wed Oct 11 , 2023
भंडारा :- जिल्हा सामान्य रुग्णालयातील एआरटी केंद्राला जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम,जिल्हा सामान्य रुग्णालय,अतिरिक्त जिल्हाचिकित्सक डॉ. टेंभुरणे,हे उपस्थित होते. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये नेत्र तपासणी कक्षामध्ये रुग्णसंख्या दिवसेदिवस वाढत असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी व कार्यालयीन नर्स व इतर कर्मचारी वाढवण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी कुंभेजकर यांचे निदर्शनास आले. त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com