आदिवासी विद्यार्थाला शिक्षका कडून मारहाण

अमरदिप बडगे, प्रतिनिधी

 पाचव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थाला मारहाण,

विद्यार्थ्यांच्या डोक्याला मार

बोरगाव आदिवासी आश्रम शाळेतील प्रकार शिक्षकाला केलं निलंबित

गोंदिया :- पुन्हा आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षका कडून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्हयाच्या देवरी प्रकल्प अधिकारी कार्यलया अंतर्गत येणाऱ्या बोरगाव आदिवासी आश्रम शाळेतील पाचव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थाला शिक्षकाने मारहाण केली असल्याने विद्यार्थांच्या डोक्यावर मार लागलेला आहे. त्यामुळें शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.

देवरी तालुक्यात आदिवासीं विभागा अंतर्गत शासकिय आश्रम शाळा चालविल्या जात आहेत.

 

बोरगाव येथे निवासी शाळा असल्याने आदिवासीं विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. पण पाचव्या वर्गात शिकत असलेल्या अक्षय पंधरे या विद्यार्थ्याला ठेंगरे नामक शिक्षकाने मारहाण केली त्यामूळे अक्षय याच्या डोक्याला मार लागला. अक्षयने संपुर्ण घटना आपल्या घरच्या लोकांना सांगीतले असताना घरच्या लोकांनी प्रकल्प कार्यालयात शिक्षका विरुध्द तक्रार दाखल केली.

त्यामुळें प्रकल्प अधिकारी राचेलवर यांनी तात्काळ शाळेत पोहचत विद्यार्थ्याला उपचारा करीता रूग्णालयात पाठवत चौकशी केली असता ठेंगरे या शिक्षकाला निलंबित केले आहे. तर शासन आदिवासीं आश्रम शाळेवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही विद्यार्थ्यांवर असा पद्धतीने वागणूक मिळत असेल तर असा शिक्षकांवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com