कन्हान :- नागपुर जबलपुर महामार्गावरील डुमरी येथील जिओ पेंट्रोल पंपासमोर एका युवकास अज्ञात वाहन चालकाने धडक मारून झालेल्या अपघातात अतुल भगत या युवकाचा घटनास्थळी मुत्यु झाल्याने कन्हान पोस्टे ला अज्ञात वाहन व चालका विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.
पवन टेकचंद भगत वय ५२ वर्षे राह. धनकोसा ता. तिरोडी. जि. बालाघाट (मध्यप्रदेश) यांचा लहान मुलगा अतुल भगत वय २५ वर्ष हा दोन वर्षा पुर्वी पारडी नागपुर येथे इलेक्ट्रिशियनचे काम शिकण्यासाठी आला होता, तेव्हापासुन तो तेथेच राहुन इलेक्ट्रिशियन म्हणुन काम करू लागला आणि घर खर्चासाठी दर महिन्याला पैसे पाठवत होता. गुरूवार (दि.११) ला काही कामा निमित्य मनसर कडे जात असताना नागपुर ते जबलपुर महामार्गावर डुमरी येथील जिओ पेट्रोल पंपासमोर अतुल ला अज्ञात वाहनाने धडक मारून पसार झाला. या अपघातात गंभीर जख्मी अतुल भगत ला कामठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासुन मुत्यु झाल्याचे घोषित केल्याने नागपुरात राहणा-या अतुलच्या मामा ला माहिती मिळताच त्यांनी अतुल च्या वडिलांना अपघात झाल्याचे सांगुन त्यांना कामठी ला बोलावुन घेतले. तेव्हा अतुल भगत चा मुतदेह मर्कु रीत शीत गृहात ठेवल्याचे सांगुन डुमरी येथे जावुन अपघात घटनास्थळ दाखविले. शुक्रवार (दि.१२) डीसेंबर ला दुपारी १.२८ वाजता अतुल भगत यांचे वडिल पवन टेकचंद भगत यांचे तक्रारीवरून कन्हान पोलीसानी त्यांचे मुलाच्या मुत्युस कारणीभुत अज्ञात वाहन व चालका विरूध्द कन्हान पोलीसानी भा.न्या. सं.२०२३ कलम २८१, १०६ (१) अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे.