युवा पिढीने शिक्षणाबरोबरच काळानुरूप कौशल्य प्राप्त करावेत : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– ३ महिन्यात राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरु होणार : मंत्री मंगल प्रभात लोढा

– पहिल्या टप्पयात १०० महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ सुरु

मुंबई :-  आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगात प्रभावशाली होण्यासाठी, देशातील युवा पिढीने शिक्षणाबरोबरच कौशल्य प्राप्त करणे ही काळाची गरज आहे. सध्या १०० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. लवकरच १००० महाविद्यालयांमध्ये हे केंद्र सुरू होणार आहे. या उपक्रमाचा लाभ महाविद्यालयातील युवक आणि युवतींनी घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या महाविद्यालयातील कौशल्य विकास केंद्रांना ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ‘ असे नाव देण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.

‘मेघदूत’ या शासकीय निवासस्थानी, कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यातील १०० महाविद्यालयातील कौशल्य विकास केंद्राच्या ‘ऑनलाईन’ उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त आयुक्त अनिल सोनवणे उपस्थित होते. दृकश्राव्य प्रणालीद्वारे १०० महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राचार्य यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणले आहे.हे धोरण राबवल्यामुळे देशात आमूलाग्र बदल घडतील. भारत हा जगातील तिसरी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहे. देशात प्रथम स्थानी येवुन जगाचे नेतृत्व करण्यासाठी आणि आपली अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी मानव संसाधन विकासावर शासनाने भर दिलेला आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.त्यानुसार महाराष्ट्रातील पात्र महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. ही गोष्ट अत्यंत आनंदाची आहे. अंतरिम अर्थसंकल्पात घोषणा केल्यानंतर त्याची तातडीने अंमलबजावणी करून महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु केल्याबद्दल या विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे त्यांनी अभिनंदन केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,बदलते तंत्रज्ञान आणि जागतिक पातळीवर कुशल मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. हे लक्षात घेऊन युवक आणि युवतींना काळाशी सुसंगत असे आवश्यक कौशल्य प्रशिक्षण या केंद्रातून देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लाभ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घ्यावा. कोणत्याही विषयाची पदवी प्राप्त करून चालणार नाही तर त्यासोबत विविध कौशल्य प्राप्त केले तर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असेही ते म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाहन चोरीचा गुन्हा करणाऱ्या आरोपीस अटक, एकूण ८ गुन्हे उघडकीस

Wed Mar 13 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे प्रतापनगर हहीत, प्लॉट नं. ७९, विमल अपार्टमेंट, शास्त्री ले-आउट, प्रतापनगर, नागपूर येथे राहणारे फिर्यादी अनिल शंकर भावे, वय ५४ वर्षे, यांनी आपले अपार्टमेंटचे पार्किंग मध्ये त्यांची बजाज कंपनीची गाडी क. एम. एच. ३१. बी.टी ५७८६ किंमती अंदाजे १०,०००/-रू, ची पार्क करून स्पॅक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादींची नमुद गाडी चोरून नेली. अशा फिर्यादीचे रिपोर्टवरून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights