संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आशा हॉस्पिटल मागील ग्रीन टाऊन सोसायटी येथे अर्चना संजय लिंगलवार यांच्या घरी पीओपी चे काम करीत असलेल्या तरुणाला इलेक्ट्रिक शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी साडे चार वाजता घडली असून मृतक तरुणाचे नाव मोहम्मद अजगर अली वय 35 वर्षे रा बलरामपूर उत्तरप्रदेश असे आहे.
पोलिसांनी यासंदर्भात घटनेची नोंद करीत मर्ग दाखल करीत मृतकाचे पार्थिव पुढील उत्तरीय तपाणीसाठी शवविच्छेदनार्थ शासकीय उपजिल्हा रुग्णाल्याच्या शवगारात ठेवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.