तरुणाची गळफास लावून आत्महत्या

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 10:- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या हैदरी चौक मार्गावर असलेल्या एका दुकानातील तरुणाने दुकानाच्या वरच्या माळ्यावरील छताच्या लोखंडी हुक ला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी 5 दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव सुशिल कमल चौधरी वय 22 वर्षे रा जुनी ओली कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा गुमास्ता बनविण्याचे काम करीत असून वडिलांच्या सुपारी दुकानात बसून वडीलाला हातभार लावायला दुकानात बसत असे.दैनंदिन प्रणाने आज सुद्धा दुकानात बसले असता काही वेळानंतर दुकानाच्या वरच्या माळ्यावर गेला.मात्र बराच वेळ होऊनही परतला नाही.दरम्यान दुकानात काम करणारा साजिद नावाचा तरुण हा वरच्या माळ्यावर ठेवलेले साहित्य आणायला गेला असता सदर मृतक तरुण हा गळफास लावलेल्या स्थितीत दिसल्याने एकच धक्का बसला.घटनेची माहिती घरमंडळींना देताच मृतकाचे वडील , काका यांनी त्वरित मदतीची धाव घेत वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तोवर उशीर झाला होता.सदर घटनेची माहिती जुनी कामठी पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.पोलिसांनी यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.मात्र आत्महत्येसंदर्भात विविध शंका कुशंका व्यक्त करण्यात येत आहे.मृतकाच्या पाठिमागे आई, वडील व दोन बहिणी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

दारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार

Wed May 11 , 2022
भानापेठ परिसरात दारू दुकान सुरु होऊ देणार नाही.                       चंद्रपूर – भानापेठ वॉर्ड येथे विजय टॉकीज जवळ सुरु होणाऱ्या बिअर शॉप रद्द करण्याकरिता भानापेठ वॉर्ड संघर्ष समितीने दिवाकर झोडे यांचे नेतृत्वात एल्गार पुकारला आहे. माजी नगरसेवक संजय कंचर्लावार यांचे प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले. भानापेठ परिसरात बिअर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com