मनपा आयुक्तांच्या हस्ते दिव्यांग खेळाडूंना साहित्य व आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान

नागपूर :- प्रबळ इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर नागपुरातील अनेक दिव्यांग खेळाडूंनी देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर नागपूर शहराला नावलौकिक मिळवून दिला आहेत. अशाच खेळाडूंपैकी काही खेळाडूंना नागपूर महानगरपालिकेच्या वतीने क्रीडा साहित्य आणि आर्थिक सहायतेचा धनादेश प्रदान करण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या हस्ते दोन खेळाडूंना क्रीडा साहित्य आणि एका खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आर्थिक सहायातेचा धनादेश प्रदान करण्यात आले.

मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभा कक्षात शुक्रवार (ता.१०) रोजी झालेल्या छोटेखानी समारंभात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या हस्ते या खेळाडूंना क्रीडा प्रदान करण्यात आले. याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांच्यासह क्रीडा विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

केंद्र शासनाने अपंग व्यक्तींच्या कल्याणासाठी अपंग व्यक्तींसाठी समान संधी, संरक्षण व समान सहभाग कायदा लागू केला असून, सदर कायद्या अंतर्गत अपंगांसाठी किमान 3 टक्के निधी राखीव ठेवण्याबाबत शासननाच्या निर्देशान्वये नागपूर महानगरपलिकेतर्फे राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणा-या दिव्यांग खेळाडू आर्थिक योजने अंतर्गत मनपा क्षेत्रातील तीन दिव्यांग खेळाडूंना त्यांच्या खेळाकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यात अभिषेक सुनिल ठवरे व संदिप गवई या दोन धनुर्विद्या खेळाच्या दिव्यांग खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरीता आंतरराष्ट्रीय दर्जाचे धनुर्विद्या खेळाचे अत्याधुनिक क्रीडा साहित्य घेण्याकरीता सदर योजनेमधून प्रत्येकी 3 लाख रुपये मनपामार्फत उपलब्ध करुन देण्यात आले. तसेच निधी विनोद तरारे या दिव्यांग खेळाडूला ब्राझिल येथे होणाऱ्या डिप ऑलिम्पिक स्पर्धेकरीता दिल्ली येथे झालेल्या निवड चाचणी करीता आर्थिक सहायतेचा रुपये 20 हजारचा धनादेश योजनेमधून देण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी पुढील वाटचालीकरिता खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

NewsToday24x7

Next Post

मायावतींच्या मीटिंगची पूर्वतयारी महाराष्ट्रात आकाश आनंदच्या 4 सभा

Sat Nov 11 , 2023
नागपूर :-बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावती या डिसेंबरमध्ये नागपुरात येतील. त्यांच्या सभेची पूर्वतयारी म्हणून बसपाचे केंद्रीय कॉर्डिनेटर व युवा आयकॉन आकाश आनंद यांच्या महाराष्ट्रातील 17 नोव्हेंबर ला नागपूर (विदर्भ), 23 नोव्हेंबरला पुणे (खान्देश), 29 नोव्हेंबर ला औरंगाबाद (मराठवाडा) व 6 डिसेंबरला मुंबईत (खानदेश) आदि चार ठिकाणी सभा होणार आहेत. हल्ली मायावती व आकाश आनंद मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com