४० देशांतील युवा नेत्यांचा राज्यपालांशी संवाद

मुंबई :- वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अंतर्गत फोरम ऑफ यंग ग्लोबल लिडर्सच्या ५० युवा सदस्यांनी आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. भारताच्या शैक्षणिक दौऱ्यावर आलेल्या ४० देशांतील या नेत्यांनी राज्यपालांशी संवाद साधला.

जगभरातील युवा नेत्यांच्या सुसंवादातून जगासमोरील सामायिक आव्हानांवर उपाय शोधता येतील असे सांगून युवकांनी संपत्ती निर्माण करावी मात्र अर्जित संपत्तीचा विनियोग समाजासाठी करावा असे आवाहन राज्यपालांनी केले.

जागतिक युवकांच्या या फोरममध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन, टेनीस दिग्गज रॉजर फेडरर आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा समावेश आहे ही अभिमानाची बाब आहे असे सांगून युवकांनी सर्वसमावेशक विकासासाठी काम करावे असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी युवा उद्योजक अमेय प्रभू, एमडी, नफा कॅपिटल, गौरव मेहता, संस्थापक, धर्मा लाइफ आणि अन्य युवा नेते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

राहूल सोलापूरकर वर ॲट्रॉसिटी दाखल करा - बसप महासचिव डॉ.हुलगेश चलवादींची मागणी

Sat Feb 15 , 2025
पुणे :- समाजामध्ये वैचारिक संभ्रम निर्माण करीत ‘छुपा एजेंडा’ राबवण्याचे कार्य तथाकथित अभिनेता राहूल सोलापूरकर करीत आहे.महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल या महाभागाने केलेले वक्तव्य त्याच्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रतिक आहे.अशा प्रवृत्तीच्या मानसिकतेला वेळीच ठेचण्याची आवश्यकता आहे.सोलापूरकर विरोधात ॲट्रॉसिटी दाखल करीत त्याला अटक करण्याची मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र प्रभारी डॉ.हुलगेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!