वाचनयुक्ती चळवळ लोकाभिमुख करावी – डॉ. नरेंद्र पाठक

नवी मुंबई :- वाचनयुक्ती चळवळ लोकाभिमुख करण्यासाठी राज्य शासनाचे ग्रंथोत्सव कार्यक्रम उपयुक्त आहेत असे मत प्रा.डॉ.नरेंद्र पाठक यांनी व्यक्त केले.

ठाणे जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन साहित्य अकादमी सदस्य प्रा. डॉ. नरेंद्र पाठक यांच्या हस्ते संपन्न झाले. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 अंतर्गत ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय, अधिकारी कार्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य मंदिर सभागृह, प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय, वाशी येथे ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले. ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनापुर्वी वाशी शहरात ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथदिंडीला विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी मुंबई विभागाच्या सहाय्यक ग्रंथालय संचालक मंजुषा साळवे, कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, प्रा. माणीकराव कीर्तने वाचनालय, साहित्य मंदिर वाशीचे अध्यक्ष सुभाष कुळकर्णी, साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष तथा प्रसिध्द कवी अरुण म्हात्रे, जिल्हा ग्रंथालय ठाण्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील आणि नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनीय भाषणात डॉ.पाठक म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून एक मोहीम राबविली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून नवीन पीढी घडत आहे. ज्याप्रमाणे व्यसनाधीन लोकांचे व्यसन सोडविण्यासाठी शासन व्यसनमुक्तीची मोहिम राबविते त्याच प्रमाणे शासनाने नव्या पिढीला पुस्तक वाचनाचे व्यसन लागावे यासाठी ही ग्रंथोत्सवाची मोहिम राबविली आहे. डॉ. पाठक यांनी पुस्तक वाचनाचे सामान्य माणसाच्या जीवनातील महत्त्व कसे आहे हे प्रसिध्द कवी दासू वैद्य यांच्या एका कवितेच्या माध्यमातून सांगितले.

प्रास्ताविकामधे जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील यांनी ग्रंथोत्सवाचे महत्त्व सांगून माणसाची विचारधारा वाचनातून निर्माण होत असल्याबाबत विविध विचारवंतांची उदाहरणे सांगितली. यानंतर साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष तथा प्रसिध्द कवी अरुण म्हात्रे यांनी वाचनाचे महत्त्व उपस्थित विद्यार्थ्यांना पटवून दिले. ते म्हणाले, भारतात महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य आहे ज्या राज्यात ग्रंथोत्सावासारखा दोन दिवस चालणार कार्यक्रम उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो म्हात्रे यांनी यावेळी आपल्या कवीतेच्या माध्यमातून उपस्थितांना वाचनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे आभार सुभाष कुळकर्णी यांनी मानले.

ग्रंथोत्सवाच्या ठिकाणी विविध विषयावरील अशा असंख्य पुस्तकांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. नागरिकांसह विद्यार्थांनी या पुस्तक प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ठाणे जिल्हा ग्रंथालय कार्यालयाने केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर

Wed Feb 21 , 2024
– मराठा आरक्षणासाठी घेतलेला निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई :- राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणासाठी घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने संमत केल्याबद्दल सर्व सदस्यांचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com