होय.. ‘कलंक’ च… ‘रोक सको तो रोक लो’, म्हणत ठाकरेंचे सैनिक उतरणार रस्त्यावर !

– हिंमत असेल तर आम्हाला रोखून दाखवा -प्रकाश जाधव 

नागपुर :- उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळणाऱ्या भाजपला जशास तसे उत्तर देण्यासाठी शिवसेनेच्यावतीने आज (ता. १२) बुधवारी दुपारी तीन वाजता व्हेरायटी चौकात निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. हिंमत असेल तर आम्हाला रोखून दाखवा, असा इशारा माजी खासदार प्रकाश जाधव यांनी गृहमंत्र्यांना दिला.

उद्धव ठाकरे यांचे विमानतळावरचे फलक फाडणाऱ्या तसेच त्यावर काळे फासणाऱ्या भाजपच्या विकृत कार्यकर्त्यांविरोधात शिवसैनिकांनी सोनेगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. यानंतर पत्रकार परिषदेत जाधव म्हणाले, आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मातोश्रीचा अपमान कुठलाच शिवसैनिक सहन करणार नाही.

आम्ही शिवसैनिक यासाठी कुठलीही किंमत मोजायला तयार आहोत. शिवसैनिक पळपुटा नाही. किती लोकांना जेलमध्ये टाकता ते आम्ही बघतो. कोणी आमच्या अंगावर येत असेल तर त्याला शिंगावर घेऊ असे ते यावेळी म्हणाले. स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी दुसऱ्यांचे पक्ष फोडणे हा महाराष्ट्रासाठी कलंकच आहे. भाजपने संपूर्ण राज्यच कलंकित केले आहे.

शहरालाही कलंकित करण्याचे काम भाजपनेच केले आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सत्य परिस्थिती मांडली. त्यामुळे भाजपचा संताप सुरू असल्याचे जाधव यावेळी म्हणाले.

बावनकुळे यांनी बोलूच नये

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भ्रष्टाचारावर बोलूच नये. नाही तर ते ऊर्जामंत्री असताना कोराडी औष्णिक ऊर्जा प्रकल्प, कोळसा आणि रेतीघाटाचे घोटाळे घेऊन आम्ही समोर येतो. तेव्हा पळता भुई थोडी होईल, असा इशारा प्रकाश जाधव यांनी दिला.

भाजपला पोलिसांचे संरक्षण

भर रस्त्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा पुतळा जाळत असताना पोलिस बघे होऊन उभे होते. परवानगीशिवाय आंदोलन करीत असताना पोलिसांनी त्यांना रोखले नाही. भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांना पोलिस संरक्षण देत होते, असा आरोपही ठाकरेंच्या शिवसेनेच्यावतीने (Shivsena) करण्यात आला. कोणाच्या दबावात पोलिस आहेत, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

यातायात नियमों की धज्जियां उड़ाता अनुशासन प्रिय भारतीय सेना का ट्रक

Wed Jul 12 , 2023
– रिजर्व बैंक चौक की घटना नागपुर :- देश में भारतीय सेना और नागरी पुलिस को काफी अनुशासन प्रिय माना जाता हैं.देश का हर नागरिक इन सैनिकों, पुलिस जवानों को अपना आदर्श मानते हुए वर्तमान समय और भविष्य में उनके ही पदचिन्हों,अनुशासन पर चलना चाहता हैं.उनसे प्रेरणा पाता हैं. भारतीय सेना और भारतीय पुलिस प्रशासन में अनुशासनहीनता के लिए कोई […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com