पुढील 24 तासांकरिता अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट

मुंबई :- भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील 24 तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ६५ – ११५ मि. मी. पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 65 मि. मी. पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातील काही महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा (दलघमी) आणि धरणांमधून सोडण्यात आलेला विसर्ग (क्युमेक्स) खालीलप्रमाणे -:

हतनूर (जळगाव) (एकूण क्षमता २५५ दलघमी) आत्तापर्यंत ६८९ क्यूमेक्स विसर्ग

इरई (चंद्रपूर) (एकूण क्षमता १५२.४० दलघमी) आत्तापर्यंत ३६.३८ क्यूमेक्स विसर्ग

गोसीखुर्द (भंडारा) (एकूण क्षमता ७४०.१७ दलघमी) आत्तापर्यंत १८६८.९३ क्यूमेक्स विसर्ग

भंडारदरा (अहमदनगर) (एकूण क्षमता ३०४.१० दलघमी) आत्तापर्यंत २३.२२ क्यूमेक्स विसर्ग

दारणा (नाशिक) (एकूण क्षमता २०२.४४ दलघमी) आत्तापर्यंत ११.३३ क्यूमेक्स विसर्ग

ऊर्ध्व वर्धा (अमरावती) (एकूण क्षमता ५६४.०५ दलघमी) आत्तापर्यंत १२६ क्यूमेक्स विसर्ग

निम्न वर्धा (वर्धा) (एकूण क्षमता २१६.८७ दलघमी) आत्तापर्यंत ७६.८४ क्यूमेक्स विसर्ग

नीरा-देवघर (पुणे) (एकूण क्षमता १५२.४० दलघमी) आत्तापर्यंत १७ क्यूमेक्स विसर्ग

बेंबळा (पुणे) (एकूण क्षमता १८३.९४ दलघमी) आत्तापर्यंत ४० क्यूमेक्स विसर्ग

पुढील २४ तासांकरिता किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांसाठी सकाळी ०३:४६ आणि दुपारी ०३:३२ वाजता भरतीची वेळ देण्यात आली असून सकाळी ३.६ मीटर आणि दुपारी ३.७ मीटर पर्यंत समुद्राच्या लाटा येण्याचा अंदाज आहे.

वीज कोसळण्याची शक्यता असणा-या जिल्ह्यातील नागरिकांनी अद्ययावत व सतर्क राहण्यासाठी आपल्या मोबईलमध्ये “DAMINI” हे ॲप डाउनलोड व इन्स्टॉल करावे. हे ॲप वापरकर्त्यांना 20 ते 40 किलोमीटर GPS नोटिफिकेशनद्वारे सतर्क करते तसेच घ्यावयाच्या खबरदारीचे उपाय देखील देते. नागरिकांनी आपत्तीं चा इशारा आणि अधिकृत सूचना प्राप्त करण्याकरिता “SACHET” App डाउनलोड व इन्स्टॉल करावे.

राज्य शासनाद्वारे नागरिकांना CAP-SACHET या पोर्टलच्या माध्यमाने वेळोवेळी सूचना आणि संदेश पाठविण्यात येत आहेत. नागरिकांनी प्राप्त होणाऱ्या सूचनांचे पालन करावे.

आपत्ती-संबंधित माहिती व मदतीसाठी नागरिकांनी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या खाली नमूद केलेल्या सोशल मीडिया अकाउंट फॉलो करावे :

फेसबुक: https://www.facebook.com/SDMAMaharashtra?mibextid=ZbWKwL

ट्विटर: https://twitter.com/SDMAMaharashtra

अतिरिक्त माहितीकरिता खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा:

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष: 1077 (टोल फ्री क्रमांक)राज्य आपत्कालीन कार्य केंद्र: 022-220279900

ईमेल: controlroom@maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासनाचे मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून २२ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ६:०० वाजता प्राप्त आकडेवारीनुसार महाराष्ट्र: हवामान सद्यस्थिती आणि अंदाज प्रसिद्धीसाठी देण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा केला शुभारंभ

Wed Aug 23 , 2023
– ग्राहकांना सुरक्षित कार खरेदी करण्यासाठी अधिकाधिक पर्याय उपलब्ध करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन – भारत एनसीएपी आणि AIS-197 अंतर्गत नवीन सुरक्षा व्यवस्था उत्पादक आणि ग्राहक दोघांसाठी लाभदायी: नितीन गडकरी नवी दिल्ली :- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्ली येथे भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (भारत एनसीएपी), […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!