दरोडा टाकण्याचे तयारीत असलेल्या आरोपींना अटक

कामठी :-दिनांक ०८.११.२०२३ चे ०१.२५ वा. सुमारास जुनी कामठी पोलीसांचे पथक पोलीस ठाणे जुनी कामठी हदीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून वारे गाव टि पाईन्ट जवळील यादवचे शेता जवळ जुनी कामठी येथे रेड कारवाई केली असता, दरोडा टाकण्याचे तयारीत असलेले आरोपी क. १) रोहित उर्फ मोटु मुसाफीर यादव वय २३ वर्षे, रा. पांचन रोड, हनुमान मंदीर जवळ कन्हान, जि. नागपूर २) शांतनु भोजराज पुरे, वय २२ वर्षे, रा. स्वामी विवेकानंद नगर, कन्हान, जि. नागपूर ३) आरीफ उर्फ सोहेल खान वल्द वकील खान वय २९ वर्षे, रा. स्वामी विवेकानंद नगर, कन्हान, जि. नागपूर ४) अरुण निलकंठ गेडाम वय ५२ वर्ष रा. रावनगर, कन्हान जि. नागपूर हे आपले ताब्यात प्राणघातक शस्त्र घेवून दरोडा टाकण्याचे तयारीत असताना समक्ष मिळुन आले व पाहिजे आरोपी ५) ईशांत लिंग मासुरकर वय ३० वर्ष कामठी, नागपूर ६) शेख वसीम उर्फ अंशु शेख मोहम्मद वाहिद वय २८ वर्ष रा. कामठी, नागपूर हे अंधाराचा फायदा घेवुन पळून गेले, ताब्यात घेतलेल्या आरोपांचे जवळून एक लोखंडी चाकू, एक लोखंडी रॉड, एक लोखंडी पेचकस, टॉर्च, दोरी मिर्ची पावडर व होन्डा कंपनीची डेस्टीनी मॉडल गाडी क्र. एम. एच. ४० सि.पी ४८५३ असा एकूण अंदाजे ५०,६१०/- रु. चा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करण्यात आला.

याप्रकरणी पोलीस ठाणे जुनी कामठी येथे पोउपनि ठाकुर यांनी आरोपविरुद्ध कलम ३९९, ४०२ भा.दं.वी. सहकलम ४/२५ भा.ह.का. सहकलम १३५ म.पो. का. अन्वये गुन्हा दाखल करून ४ आरोपांना अटक केलेली आहे. पुढील तपास सुरू आहे.

NewsToday24x7

Next Post

प्राणांतिक अपघात करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

Thu Nov 9 , 2023
नागपूर :- दिनांक ०४.११.२०२३ चे ०५.४५ वा. चे सुमारास फिर्यादी अशोक तारानाथ मुन वय ६३ वर्ष रा. प्लॉट नं. ५८, मंगलदिप नगर, मानेवाडा, बेसा रोड, नागपूर हे तसेच त्यांचे सोबत मित्र नामे उत्तम मणिराम पवार वय ५५ वर्ष रा. प्लॉट नं. ६१, मंगलदिप नगर, मानेवाडा, बेसा रोड, नागपूर व ईतर एक मित्र सुरेश डाग असे तिघे नेहमी प्रमाणे सकाळी मॉनींग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com