वृत्तपत्र दिनानिमित्त यवतमाळ वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

यवतमाळ :- दिनांक 15/10/2024 ला रविवार रोजी माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वृत्तपत्र दिन म्हणून पेपर वितरण सेंटरवर साजरा करतो. यवतमाळ जिल्हा वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी संस्था यांच्या वतीने वर्तमानपत्र दिन साजरा करून संघटनेच्या वतीने सर्वप्रथम माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम व माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे सचिव किरण कोरडे तसेच अविनाश पांडे, कमलनयन कोठारी यांनी पूजन केले. संघटनेचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी वृत्तपत्र विक्रेता बंधूंना वर्तमानपत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते बंधूंचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. कस्तुरचंद सेठिया,राजेश काळे, शिवशंकर चावरे,मदन केळापूरे, श्रीपाद तोटे, दिलीप पोहरे, लक्ष्मणजी देशमुख या सर्व ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते सदस्यांना पुष्गुच्छ देऊन गौरव करण्यात आले. राज्य संघटनेचे उपाध्यक्ष संतोष शिरभाते व सदस्य किशोर भेदरकर यांनी विक्रेते सदस्यांना मार्गदर्शन केले. प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्हाप्रमुख बिपिन चौधरी यांनी विक्रेत्यांना भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच दैनिक लोकमतचे राजू कळसकर, दै. पुण्यनगरी चे नंदकुमार गोगटे, दै. भास्कर चे आशिफ शेख , दै. अजिंक्य भारतचे जयकुमार राठोड या सर्व मान्यवरांनी वृत्तपत्र दिनानिमित्त यवतमाळ वृत्तपत्र विक्रेता बांधवांना पेपर वितरण सेंटरवर येऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संघटनेचे उपाध्यक्ष राजू हनवते,राजू भलावी, सचिव किरण कोरडे, सहसचिव तुषार गुज्जलवार, कोषाध्यक्ष श्रीराम खत्री, सल्लागार मदन केळापुरे, प्रसिध्दी प्रमुख सचिन कदम,सदस्य सुनील बोरकर, रवींद्र चव्हाण, प्रवीण आगलावे तसेच असंख्य विक्रेते बांधव यांनी हातभार लावला. शेवट विक्रेते बांधवांनी चहा व नास्ता असा अल्प उपहार घेऊन शेवट झाला. असे श्रीराम खत्री यांनी जाहीर केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त म.न.पा.तर्फे अभिवादन

Wed Oct 16 , 2024
नागपूर :- विज्ञान शैक्षणिक क्षेत्रात बहुमोल योगदान देणारे युगपुरुष व “मिसाईल मॅन” भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त तैलचित्रास आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी म.न.पा. केन्द्रीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील दालनात माल्यार्पण करुन अभिवादन केले. या प्रसंगी अति. आयुक्त आँचल गोयल, उपायुक्त विजया बनकर, उपायुक्त गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी प्रामुख्याने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com