नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भस्तरीय ज्यूडो स्पर्धेला सोमवार, १३ जानेवारीपासून सुरुवात झाली. ईश्वर देशमुख शारिरीक शिक्षण महाविद्यायामध्ये ही स्पर्धा सुरु आहे. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विदर्भ ज्यूडो असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. राजकुमार पुंडकर, माजी क्रीडा उपसंचालक जयप्रकाश दुबळे, दी ज्यूडो असोएशन नागपूरचे अध्यक्ष पुरुषोत्तम चौधरी, साई प्रशिक्षक विजय धिमन, ज्यूडो असोसिएशनचे सचिव मुकुंद डांगे, नरसिंग यादव, जयंत साखरे, खासदार क्रीडा महोत्सवाचे सहसंयोजक नागेश सहारे, सुरेंद्र राउत, मोहन टोंग, गणेश निंबर्ते उपस्थित होते.
स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी यवतमाळ येथील दिग्रस संघाचा दबदबा दिसून आला. सबज्यूनिअर्स गटामध्ये १४ वर्षाखालील मुलींमध्ये विविध वजनगटात दिग्रस, जिल्हा यवतमाळ येथील मुलींनी बाजी मारली.
निकाल (प्रथम, द्वितीय व तृतीय)
सबज्यूनिअर्स – १४ वर्षाखालील मुली
२० किलोपेक्षा कमी वजनगट
निहारिका कांबळे (दिग्रस), रिया सातपुते (दिग्रस), वैष्णवी खाडके (दिग्रस)
२४ किलोपेक्षा कमी वजनगट
आरोही ढोरे (दिग्रस), आराध्या भोयर (वर्धा), गुंजन शिवारे (नागपूर)
२८ किलोपेक्षा कमी वजनगट
कनक कोल्हे (वर्धा), धन्वी कुटे (दिग्रस), काव्या चौधरी (सेंट विसेंट पलोटी नागपूर)
३२ किलोपेक्षा कमी वजनगट
सारंगी चव्हाण (दिग्रस), तन्वी कन्नाके (वर्धा), ईश्वरी भुलके (दिग्रस)
३६ किलोपेक्षा कमी वजनगट
अनन्या रेगुलवार (दिग्रस), संकृती आडे (दिग्रस), समृद्धी वासनिक (नागपूर)
३६ किलोवरील वजनगट
रिया डिके (दिग्रस), उन्नती भोस्कर (नागपूर), जागृती राठोड (दिग्रस)