विनयभंग करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

नागपूर :- पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत राहणाऱ्या ४० वर्षीय फिर्यादी यांची १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही शाळेत जात असतांना दिनांक २५.०१.२०२४ ते दि. १०.०३.२०२४ चे दरम्यान, आरोपी राशीद मोहम्मद लाल कसाई शेख वय ३० वर्ष रा. पाचपावली, नागपूर हा तिचे मागे मागे जावुन तिला “मैं तुमसे प्यार करता हूँ, शादी करना चाहता हूँ” असे म्हटले असता, फिर्यादीचे मुलीने नकार दिला असता, आरोपीने फिर्यादीचे मुलीस तिचे आई वडीलांना मारण्याची धमकी देवुन सोबत तिचे मनास लज्जा येईल असे कृत्य करून फिर्यादीचे मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिनांक ११.०३.२०२४ रोजी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे पाचपावली येथे मपोउपनि, शेळके यांनी आरोपीविरूध्द कलम ३५४, ३५४ (ड), ५०६ भा.द.वि. सहकलम ८,१२ पोक्सो कायदयान्वये गुन्हा दाखल करून, आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दुखापत करणारा आरोपी ताब्यात

Tue Mar 12 , 2024
नागपूर :- दिनांक ०९.०३.२०२४ चे ०९.३० वा. च्या सुमारास पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत, लॉट नं. १२२, शिव सुंदर नगर, वाठोडा, नागपूर येथे राहणारे फिर्यादी दानीश आलम मेहबुब आलम, वय ३७ वर्षे यांचे कडुन आरोपी तोहीद खान वल्द सलमान खान वय ३५ वर्ष रा. शिव सुंदर नगर, वाठोडा, नागपूर याने ५,०००/- रू उधार घेतले होते. याच उधारीचे पैश्याचे कारणावरून आरोपीने फिर्यादीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com