कुस्तीपटू स्वास्तिक व प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी अंशुलचा सत्कार 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- महाराष्ट्र राज्य शम्बो कुस्ती असोसिएशनतर्फे बालेवाडी पुणे येथे झालेल्या स्पर्धेत कुस्तीपटू स्वास्तिक सचिन यादव याने सुवर्णपदक पटकावले. त्याची राष्ट्रीय शम्बो कुस्तीकरिता निवड झाली. याबद्दल कामठीतील अय्या वस्ताद अखाडा येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्या हस्ते स्वास्तिकचा सत्कार करण्यात आला. तसेच एसएससी (सीबीएसई) परीक्षेत मार्च २०२३ मध्ये ९५ टक्के गुण घेऊन प्रावीण्य मिळविणाऱ्या अंशुल नीरज यादव याचाही सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक पोरे यांनी खेळासोबतच शिक्षणाला महत्त्व देऊन आपले जीवनमान उंचावण्याचे आवाहन केले. याप्रसंगी अय्या वस्ताद अखाडा समितीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष नीरज यादव, केशव मोहरे, मुकुंद यादव, रमेश कनोजिया, सुनील यादव, गगन्ना अरगुटलेवार, अशोक यादव, नरोत्तम अरगुलेवार उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Muslims in Mumbai and Maharashtra, are you listening? 

Mon May 13 , 2024
I think by the looks of it as to how things are unfolding, very soon we might get a Hindu Hriday Samrat’s son ‘Janaab’ apologising for the Babri masjid incident…Why do I say this, read below… Do you all know what is a ‘rebound’ in love? If a girl or boy breaks up with his or her partner and they […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!