विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल ठरले जागतिक शांतीचे केंद्र-वंदनीय पूज्य भदंत कानसेन मोचीदा 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारूनिक तथागत गौतम बुद्धाचा विचार हा जगात शांतता प्रस्थापित करणारा आहे.बुद्धाची विचारधारा ही प्रत्येक मानवात रुजेल आणि यातून जगात शांतता नांदेल.

सहअस्तित्व,सहसमृद्धी पुढे नेण्यासाठी तथागत गौतम बुद्धानी सांगितलेले लोकसूत्राचे मूळ आपण मानले पाहिजे हा आपल्या सर्वांचा जीवनाचा मूळ आधार आहे.बुद्धाच्या या तत्वावर विश्वास ठेवून लोकसूत्राचे पालन पाळले पाहिजे.सन 1999 मध्ये कार्तिक पोर्णिमेच्या दिवशी उभारण्यात आलेल्या कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा आज 24 वा वर्धापन दिन असून सुलेखा कुंभारे यांचा तथागत गौतम बुद्धावरील आदरभाव व धम्माचा मार्ग पुढे नेण्याच्या कार्याला लक्षात घेत दरवर्षी जपाणहून अनेक नागरिक या ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला भेट देत असतात तर आजच्या स्थितीत ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे जागतिक शांतीचे केंद्र ठरत असल्याचे मौलिक प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय पूज्य भदंत कानसेन मोचीदा यांनी ड्रॅगन पॅलेस स्थापना दिन कार्यक्रमात व्यक्त केले.याप्रसंगी जपाणहून आलेले पुज्यनिय भिक्खु संघ, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री ना नितीन गडकरी, आमदार टेकचंद सावरकर तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख व ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे व सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड तसेच फूड कोर्ट चे सुप्रसिद्ध आर्किटिस्ट हबीब खान व स्ट्रक्चरल दिलीप मसे प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपान येथील कोयासान विद्यापीठातुन डॉक्टरेट ची पदवी प्राप्त झाल्याने त्यांचा पुज्यनिय भदंत कानसेन मोचीदा तसेच ऍड सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

प्रारंभी सकाळी 11 वाजता जपान येथून आलेल्या आंतराष्ट्रीय निचिरेन शु फेलोशिप असोसिएशन व सोनेनजी विहाराचे प्रमुख वंदनीय पूज्य भदंत कानसेन मोचीदा यांच्या प्रमुख उपस्थितीत व भिक्खु संघाच्या सहभागात तसेच माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांच्या उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना व धम्मदेसना संपन्न झाले. तत्पूर्वी ऍड सुलेखा कुंभारे यांनी जपान येथून आलेल्या वंदनीय पूज्य भिक्खु संघाचे स्वागत केले.

याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सांगितले की ड्रॅगन पॅलेस टेम्पल चा पुढच्या वर्षी 25 वा वर्धापन दिन असून या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त येथे प्रस्तावित असलेले बुद्धिस्ट थीम पार्क, यात्री निवास सुविधा आदी राज्य सरकारच्या वतीने पूर्णत्वास आणण्यात येतील.तर खऱ्या अर्थाने ड्रॅगन पॅलेस चा पुढच्या वर्षी होणारा 25 वा वर्धापन दिन हा ऍड सुलेखा कुंभारे यांच्या सहनशीलतेची, मेहनतीची व प्रमाणिकतेची समर्पित असणारे 25 वे वर्षे आहे हे म्हणणे खरे ठरेल.ड्रॅगन पॅलेस च्या दानंदात्या मॅडम नोरिको ओगावा ह्या पुण्यातमा होत्या त्यामुळे त्यांनी त्यांच्या सारख्या पुण्यात्मा म्हणून सुलेखा मध्ये बघितले त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून पवित्र अश्या ड्रॅगन पॅलेस टेम्पल ची निर्मिती केली.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दीक्षाभूमी येथे धम्माची दीक्षा दिली. मानवाला मानव म्हणून जगण्याचा अधिकार दिला तसेच जगात शांतता नांदली पाहिजे ,सर्वांचा एकत्रित विकास झाला पाहिजे.तसेच समता आणि बंधुतेचा संदेश बाबासाहेबानी दिला.याच संदेशाला प्रस्थापित करण्याचे मौलिक कार्य ऍड सुलेखा कुंभारे करीत आहेत असे मौलिक मत व्यक्त केले.याप्रसंगी ड्रॅगन पॅलेस परिसरातील अप्रतिम अशा ‘फूड कोर्ट ‘चे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने रिमोट द्वारे करण्यात आले.तसेच दोन दिवसीय ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल चे सुद्धा उद्धघाटन करण्यात आले.तसेच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या माध्यमातुन भारत जपान मैत्रीचा धागा दृढ होत असल्याचे मनोगत व्यक्त करीत समयोचित असे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड सुलेखा कुंभारे यांनी केले तर आभार वंदना भगत यांनी मानले.

दोन दिवसीय ड्रॅगन पॅलेस फेस्टिवलचा आज शुभारंभ करण्यात आला असून या फेस्टिवल अंतर्गत दुपारी 2 वाजता कामठी येथील विद्यालयीन तसेच महाविद्यालयिन तसेच हरदास हायस्कुल व ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल व इतर स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले ज्यामध्ये त्यांनी विविध प्रबोधनपर संस्कृतीक कार्यक्रम सादर केले. त्यानंतर मुंबई येथील प्रसिद्ध गायक इंडियन आयडियल फेम राहुल सक्सेना व सारेंगामा फेम राहुल भोसले यांचा ‘बुद्ध ही बुद्ध’ प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला .ज्यामध्ये सर्व प्रेक्षकगण मंत्रमुग्ध झाले होते. कार्यक्रमात मोठ्या संख्येत धम्मसेवक व धसमसेविका उपस्थित होते.या दोन दिवसीय ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र शासन चा सांस्कृतिक कार्य विभाग ,सांस्कृतिक कार्य संचालनालय तसेच ड्रॅगन पॅलेस ओगावा सोसायटी,हरदास विद्यालय ,ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल ,हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था,डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संशोधन केंद्र,दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र आदी पदाधिकारी नी मोलाचे परिश्रम घेतले.

बॉक्स:-उद्या 28 नोव्हेंबर ला सायंकाळी 5 वाजता संतोष सावंत व संच यांचा मुंबई बँड व म्युजिक मेडिटेशन प्रबोधन पर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध गायक अभिजित कोसंबी व प्रसंनजित कोसंबी यांचा गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कांग्रेस उम्मीदवार श्रीनिवास रेड्डी के समर्थन में उतरे छत्तीसगढ़ के CM

Mon Nov 27 , 2023
– महाराष्ट्र के पूर्व मंत्री अनीस अहमद ने जोश भरी आदिलाबाद :- तेलंगाना में चल रही विधानसभा चुनाव में कांग्रेस ने पूर्ण ताकत झोंक दी। रोजाना स्थानीय उम्मीदवार श्रीनिवास रेड्डी के समर्थन में AICC द्वारा अधिकृत स्टार प्रचारकों उपस्थिति दर्ज करवाई जा रही है। AICC ओवज़र्वेर सैयद गौसुद्दीन के अनुसार श्रीनिवास रेड्डी के समर्थन में छत्तीसगढ़ के मुख्यमंत्री भूपेश बघेल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com