पुस्तकांचे गाव ‘भिलार’ हे देशासाठी आदर्श गाव – राज्यपाल रमेश बैस

सातारा :- महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे पुस्तकांचे गाव देशासाठी आदर्श असल्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले.

महाबळेश्वर येथे दौऱ्यावर आले असता राज्यपाल रमेश बैस यांनी भिलार या पुस्तकांच्या गावाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, भिलारचे सरपंच शिवाजी भिलारे, उपसरपंच सुनीता भिलारे, सदस्य वंदना भिलारे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

पुस्तकांचे गाव भिलार पहायला मिळाले हे सौभाग्य असल्याची भावना व्यक्त करून राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, या गावातील लोकांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. देशातील नागरिकांसाठी ज्ञानाचे भांडार खुले केले आहे. इंटरनेटच्या जगात लोकांचे पुस्तक वाचन कमी झाले आहे. पण या गावात लोकांनी पुस्तकांसाठी राहत्या घरातील जागा दिली आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. संपूर्ण गाव म्हणजेच ग्रंथालय असणे ही एक आगळी-वेगळी आणि आनंदाची गोष्ट असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी राज्यपाल रमेश बैस यांनी राज्य मराठी विकास संस्थेच्या कार्यालयास भेट देऊन पुस्तकांचे गाव या संकल्पनेची माहिती घेतली. तसेच गावातील शशिकांत भिलारे, वंदना भिलारे यांच्या घरातील पुस्तकालयासही भेट दिली.

NewsToday24x7

Next Post

महाराणा प्रतापसिंह यांची जयंती नवी दिल्ली येथे साजरी

Mon May 22 , 2023
नवी दिल्ली :- महाराणा प्रतापसिंह यांची जयंती महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्र येथे आज साजरी करण्यात आली. कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील आयोजित कार्यक्रमात प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती निवा जैन यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र परिचय केंद्रात महाराणा […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com