आज कर्जप्रकरण तयार करण्याबाबत कार्यशाळा

नागपूर :- जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या विद्यमाने विशेष सहाय्य शासकीय आयटीआय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था उपकेंद्र नागपूर, शासकीय आयटीआय कॉलेज उमरेड मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सीएमईजीपी योजना माहिती व कर्जप्रकरण तयार करणे कार्यशाळेचे आयोजन 29 डिसेंबरला दुपारी 1 वाजता बार्टी, सामाजिक न्याय भवन, नागपूर येथे करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम कर्जप्रकरण तयार करण्यासाठी कागदपत्रे, पासपोर्ट साईझ फोटो, आधार कार्ड, पेनस कार्ड, लाइट बील, बँक पासबुक, रहिवासी दाखला, मार्कशिट, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), स्पेशल प्रवर्ग प्रमाणपत्र( दिव्यांग प्रमाणपत्र-लागू असल्यास) या मेळाव्यात येतांना जिल्ह्यातील युवक युवतींनी सोबत आणावे व कार्यशाळेचा लाभ घ्यावा.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी श्रीकांत कुलकर्णी मो.नं. 9403078760 व कार्यक्रम समन्वयक सारंग मानवटकर 9860009556 तसेच पुष्पलता खिराडे 9423810298 एमसीईडी, उद्योग भवन, सिव्हील लाईन यांच्याशी संपर्क करावा

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्य सरकारतर्फे खेळाडूंच्या पुरस्कारांच्या रकमेत 10 पट वाढ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Thu Dec 28 , 2023
– बल्लारपूर येथे राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन चंद्रपूर :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त विकासाचा 11 सूत्री कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून यात क्रीडा क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. याच धर्तीवर राज्य शासनानेही खेळाला प्रथम प्राधान्य दिले आहे. याचाच एक भाग म्हणून भविष्यातील ऑलिम्पिक स्पर्धेत खेळाडूंना प्रेरणा मिळावी, यासाठी राज्य शासनाने खेळाडूंच्या पुरस्कारांच्या रकमेत दहा पटीने वाढ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com