नागपूर :- ज्येष्ठांचा आशीर्वाद, महिलांचा उत्साह आणि तरुणांच्या प्रचंड गर्दीच्या साक्षीने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या लोकसंवाद यात्रेचे दक्षिण नागपुरात आज (शनिवार) जंगी स्वागत झाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लोकसंवाद यात्रा आज दक्षिण नागपुरात दाखल झाली. रमणा मारोती परिसरात यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी आमदार मोहन मते, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत पवार, शिवसेनेचे नेते सुरज गोजे यांची उपस्थिती होती. रमणा मारोती येथून ईश्वर नगर, कुकरेजा पॅरिस सिटी, दत्त मंदिर, किर्ती अपार्टमेंट चौक, या मार्गाने शारदा चौकात यात्रा दाखल झाली. प्रत्येक वस्तीमध्ये लोक रस्त्यावर येऊन ना. गडकरी यांच्यावर पुष्पवर्षाव करीत होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी आवर्जून घराबाहेर पडत ना. गडकरी यांना आशीर्वाद दिला.
काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघटनांनी गडकरींना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले आणि निवडणुकीतील दणदणीत विजयासाठी शुभेच्छा दिल्या. संपूर्ण यात्रेत महिलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. लोकसंवाद यात्रेसाठी महिलांनी रांगोळ्या काढल्या होत्या. महिला पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या आणि ना. गडकरी यांच्या प्रचाररथाचे स्वागत करून औक्षण केले. तिरंगा चौक येथे स्वप्नील साळुंखे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाररथाचे जंगी स्वागत केले. याठिकाणी ना. श्री. गडकरी यांच्या प्रचाररश्रावर फुग्यांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी तिरंगा चौक तरुणांच्या गर्दीने अक्षरशः बहरलेला होता. यात्रेदरम्यान विविध हॉस्पिटल्स, कोचिंग क्लासेस, सलून, रेस्टॉरेंट्स, दुकाने येथील कामगार व कर्मचारी वर्गाने उत्स्फूर्तपणे बाहेर पडून ना. गडकरी यांना शुभेच्छा दिल्या. सक्करदरा चौक परिसरात दांडपट्टा व तलवारबाजीच्या प्रात्यक्षिकाने ना. गडकरी यांचे स्वागत करण्यात आले.
याठिकाणी काही तरुणांनी ‘अब की बार चारसो पार’ हे वाक्य लिहिलेले फलक उंचावले होते. तर एका तरुणी हातात तलवार घेऊन घोडस्वारी करीत ना.गडकरी यांच्या प्रचाररथापर्यंत आली आणि त्यांना अभिवादन करून शुभेच्छा दिल्या. सक्करदरा चौक व्यापारी संघ व व्यापारी आघाडीच्या वतीने देखील याठिकाणी यात्रेचे स्वागत करण्यात आले. आयुर्वेदिक कॉलेज, महाकाळकर भवन, सुर्वे ले-आऊट, दत्तात्रय नगर, ताजबाग दर्गा, शहनशाह चौक, न्यू सुभेदार, उदय नगर रोड, गजानन शाळा, अयोध्यानगर चौक, नागोबा मंदिर, शारदा चौक, रक्षक किराणा, तुकडोजी चौक, प्रोफेसर कॉलनी, विमा दवाखाना, हनुमान नगर, मेडिकल रोड या मार्गाने चंदनगनर पोलीस स्टेशन परिसरात यात्रेचा समारोप झाला.
लोकसंवाद यात्रा आज पूर्व नागपुरात
ना. नितीन गडकरी यांची लोकसंवाद यात्रा (रविवार, दि. १४ एप्रिल) सकाळी १० वाजता पूर्व नागपुरात दाखल होणार आहे. तत्पूर्वी, सकाळी ९ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान चौकातील त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करतील. त्यानंतर ९.२० वाजता ते दीक्षाभूमी येथे भेट देतील. त्यानंतर सकाळी १० वाजता सतरंजीपुरा चौक येथून लोकसंवाद यात्रेला प्रारंभ होईल. मारवाडी चौक, प्रेमनगर चौक, कालीमाता मंदिर, भरतवाडा चौक, मोठा सिमेंट रोड, श्याम नगर या मार्गाने पारडी येथील हनुमान मंदिर येथे यात्रा पोहोचेल व याठिकाणी यात्रेचा समारोप होईल.