लातूर, यवतमाळ, नाशिक, सोलापूर जिल्ह्यातील अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई :- लातूर बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब देशमुख, नाशिक येथील स्वामी श्रीकंठानंद, पुसद नगरपालिकेचे माजी सभापती अजय पुरोहित आदींसह लातूर, यवतमाळ, नाशिक, सोलापूर या जिल्ह्यातील विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला खा. सुधाकर श्रृंगारे, आ. अभिमन्यू पवार, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, प्रदेश सचिव नवनाथ पडळकर, पदवीधर प्रकोष्ठ प्रदेश संयोजक धनराज विसपुते आदी उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार्‍यांमध्ये उमरखेड नगरपालिकेचे माजी सभापती अ‍ॅड. शैलेश मुंगे, यवतमाळ जिल्ह्यातील सरपंच संघटनेचे अध्यक्ष अमोल चिकणे, सोनार सेवा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, मनोहर खरवडे, अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्र महाडोळे, अमोल गुर्नुले, सोलापूर येथील लिंगायत महिला मंडळाच्या अध्यक्ष रंजना चकोटे, अ.भा.वाल्मिकी नवयुवक संघाच्या युवक आघाडीचे अध्यक्ष आणि उल्हासनगरचे माजी नगरसेवक मोहन कंडारे, संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हाध्यक्ष स्वप्निल इंगळे, पंकज शेलार, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे आदींचा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यातील स्वामी श्रीकंठानंद हे रामकृष्ण आरोग्य संस्थानचे अध्यक्ष असून या संस्थेतर्फे नाशिक जिल्ह्यात आरोग्य आणि अध्यात्मिक क्षेत्रात अनेक उपक्रम राबवले जातात.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, इंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

Tue Feb 13 , 2024
नागपूर :- शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०७ केस मध्ये एकुण ०७ ईसमावर कारवाई करून रू. १३,०९५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, जुगार कायद्यान्वये ०१ केसमध्ये एकुण ०४ ईसमावर कारवाई करून रू. ८८०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३५७५ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. ५,८६,४००/- तडजोड […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com