– संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 9:- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना करीता पी. व्ही. आर. वेंकटा रामानेन्ह इंजिनिअर प्रा. ली. चिखली, कळमना मार्केट रोड, नागपुर येथे आज 9 मार्च ला सकाळी 8:30 वा. जनजागृती करीता पथनाट्य कार्यक्रमाचे आयोजन . करण्यात आले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून .टि. संदीप बिहारकर एच. आर. सीनियर मँनेजर MIDC बुटिबोरी , प्रमुख पाहुणे .प्रणव रामानेन्ह प्रॉजेक्ट मँनेजर, विशेष अतिथी .नंदलाल राठोड सहायक कल्याण आयुक्त नागपुर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक कामगार कल्याण अधिकारी .कांचन वाणी यांनी केले. सहायक कल्याण आयुक्त यांनी कामगारांना विविध योजनांची माहीती दिली.
केंद्र प्रमूख हेमंत जोँजाळ यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.
रोशन खोब्रागडे व त्यांच्या संघाने कोविड 19 व महिला सबलीकरणावर पथनाट्या द्वारे कामगारांनामधे जनजागृती केली.
कार्यक्रम यशस्वी करण्या करीता शुभदा गळगटे , नलीनी मेहर, रितेश गुजर, चंदु सूर्यवंशी व पीयूष ढोरे यांनी परिश्रम घेतले.