संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- येथील सरस्वती कॉन्वेंट चा विद्यार्थी अधिराज राकेश गजभिये याने नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत घवघवीत यश मिळविले.त्याची नवोदय विद्यालयात निवड झाली आहे.
अधिराजच्या या यशाबद्दल माजी नगरसेविका संध्या रायबोले व अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.त्याला मुख्याध्यापिका अनिता पैगवार, शिक्षिका मनिषा नागपुरे, कल्पना शर्मा व आईवडीलांनी मार्गदर्शन केले.