नागपूर :- गोंडवाना विकास मंडळ, तुकडोजी पुतळा चौक, मानेवाडा रोड येथे आदिवासी समाजातील मातृशक्तीला, विविध आदिवासी संघटनांना व बचत गटांना एकत्रित आणून, संयुक्त आदिवासी महिला समन्वय समितीच्या विद्यमाने जागतिक महिला दिन आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व आदिवासी मातृशक्तीला आपले कलागुण सादर करण्यासाठी एक मंच मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला बाल कल्याण पर्यवेक्षक अधिकारी सुजाता मडावी यांनी केले. अध्यक्षस्थान सुमित्रा टेकाम यांनी भूषविले. त्यांनी महिला शक्तीचे महत्त्व पटवून दिले.गोंडराजांच्या वंशज राजमाता राजेश्री देवी शहा उईके यांचा सल्लेर गागरा स्मृती चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. आदिवासी कर्तबगार महिला स्वाती कुंभरे, पूर्वा वाढवे यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्या प्रा दुर्गावती सयाम (माजी सभापती) यांनी शिक्षणविषयक माहिती व मार्गदर्शन केले. रमा मसराम, गोंडवाना विकास मंडळ सदस्य यांनी संघटनेचे महत्त्व पटवून दिले. यावेळी शिला मरस्कोल्हे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गंगा टेकाम यांनी केले. आभार प्रदर्शन अधिश्री कोकर्डे यांनी केले.
यावेळी विणा मडावी, मीना कोकर्डे, शीतल मडावी, प्रीती पंधराम, प्रीती कुळमते, पौर्णिमा पेंदाम, नंदा टेकाम, वनिता सिडाम, सुनीता सिडाम, चुन्नी सिडाम, सारिका आत्राम, अरुणा कोकोडे, पुनम टेकाम, मेघा मरस्कोल्हे, लता आत्राम, नलिनी सरोते व संयुक आदिवासी महिला समन्वय समिती नागपूरच्या या संपूर्ण टीमच्या अथक परिश्रमाने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. मानिनी आदिवासी महिला मंडळ, गोंडवाना गणतंत्र पार्टी महिला प्रकोष्ठ, हिराई आदिवासी महिला बचत गट, परिवर्तन गोंडवाना आदिवासी महिला बचत गट, आदिवासी महिला गट आदी संस्थांचे कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. नागपूर जिल्हा अध्यक्षा गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या गंगा टेकाम यांनी ही माहिती दिली.